चंद्र आणि मंगळानंतर इस्रो झेपवणार ‘या’ ग्रहाकडे

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : वृत्तसंस्था – अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२३ मध्ये ही मोहीम काढली जाण्याची शक्यता आहे. येत्या १० वर्षांमध्ये इतरही अनेक मोहिमा आखून त्या यशस्वी करण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे.

इस्रोचे संशोधन यशस्वी झाल्यास २०२३ मध्ये भारताचे अंतराळयान पहिल्यांदा शुक्र ग्रहावर उतरेल. इस्रोच्या मंगळयान मोहीमेला मिळालेल्या यशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्र आणि पृथ्वीमध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. शुक्र ग्रहाची अभ्यास मोहीम या ग्रहाच्या विविध थरांचा, वातावरणाचा आणि सूर्याशी येणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणार आहे.

या मोहिमेची घोषणा केल्यानंतर आम्हाला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे या मोहिमेबाबतचेची माहिती वृत्त समजताच जगभरातल्या सुमारे २० देशांनी या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे अशी माहिती इस्रोचे चेअरमन के. सीवन यांनी म्हटलं आहे.

इस्रोचा विक्रम-

इस्रो सतत नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. सातत्याने भारतासह इतर देशांचे उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपण करत आहे. पुढील वर्षी ‘इस्रो’ला ५० वर्षे पूर्ण होतील. इस्रो’ने आतापर्यंत २८ हून जास्त देशांचे उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. अंतराळातील उपग्रह पाडणारी मिशन शक्ती मोहीम यशस्वी केल्यांनतर एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रहांचे सोमवारी श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.