खुशखबर ! तुम्ही १२ वी पास असाल तर तुम्हाला मिळू शकते ‘इस्रो’मध्ये नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे ISRO मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. बारावी, आयटीआय झालेले तरुण या पदांसाठी अर्ज करू शकतात. इस्रोमधील Propulsion Systems Unit मध्ये ही नोकरभरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा पास असल्यास तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. आयटीआय केलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. थेट देशाच्या अवकाश संशोधन संस्थेसाठी ते काम करू शकतात.

या पदांसाठी करू शकता अर्ज
१)Technician and Draughtsman in B-level
२) catering attendant

इतके आहे मानधन
या पदांसाठी उत्तम मानधन देखील मिळणार आहे.
१)Technician and Draughtsman in B-level या पदासाठी २१७०० – ६९१०० रुपये एवढा पगार असेल.
२)catering attendant या पदासाठी देखील उत्तम मानधन असून १८,०००- ५६,९०० ही पगाराची रेंज आहे.

वय आणि अट

या पदांसाठी २५ ते ३५ वर्षाचा कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो. ओबीसी आणि एससी वर्गासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही www.lpsc.gov.in या वेबसाईटवर फॉर्म उपलब्ध असतील. १८ जूनपासून या अर्जाची लिंक खुली होईल. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २ जुलै आहे.

 

त्यामुळे चांद्रयान मोहिमेसाठी इस्रो मोठ्या प्रमाणावर तरुणांना संधी देत असल्याने या संधीचा फायदा घ्यायला हवा. या संस्थांमध्ये काम करण्यासाठी उच्चशिक्षित उमेदवार लागतात, मात्र इस्रो बारावी पास तरुणांना उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे.

सिनेजगत

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार