ISRO नं PSLV C49 च्या 10 च्या उपग्रहांना केलं लॉन्च, प्रत्येक ऋतुमध्ये पृथ्वीवर राहणार नजर

पोलिसनामा ऑनलाइन – इस्रोनं (Indian Space Research Organisation – ISRO) आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी PSLV-C49 द्वारे 10 उपग्रह लाँच करण्यात आले आहेत. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून ( Satish Dhawan Space Centre, Sriharikota) हे लाँचिंग केलं आहे. यातील 9 उपग्रह आंतरराष्ट्रीय आहेत तर 1 भारताचा अर्थ ऑब्झर्व्हेशन (EOS-01) हा उपग्रह (Earth observation satellite) आहे. शुक्रवारी या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली होती.

या लाँचिंगमध्ये प्रायमरी सॅटेलाईड EOS-01 एक रडार इमेजिंग सॅटेलाईट आहे. हे एक अ‍ॅडव्हान्स रिसेट आहे ज्याचा सिथेंटीक रडार ढगांच्या पलीकडेही पाहू शकतो. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, EOS-01 अर्थ ऑब्झर्व्हेशन रिसेट सॅटेलाईट ही एक अ‍ॅडव्हान्स सीरिज आहे.

EOS-01 अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट हे पृथ्वीवर लक्ष ठेवणारं सॅटेलाईट आहे. याद्वारे शेती, जंगल, आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत होणार आहे. इस्रोनं सांगितलं आहे की, इतर आंतरराष्ट्रीय सॅटेलाईट हे न्यूस्पेस इंडिया लिमिटेड यांच्यासोबत झालेल्या व्यावसायिक कराराअंतर्गत सोडण्यात आले आहेत.