ISRO चे महत्वपूर्ण 75 वे अवकाश प्रक्षेपण !

श्रीहरीकोटा : पोलीसनामा ऑनलाइन – सतीश धवन अवकाश केंद्रावरुन रिसॅट २ बीआर १ या उपग्रहाचे होणारे प्रक्षेपण इस्सोसाठी महत्वपूर्ण असणार आहे.कारण इस्रोचे हे ७५ वे प्रक्षेपण असणार आहे. तसेच येथे विकसित करण्यात आलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण रॉकेट पीएस एलव्ही चे हे ५० वे उड्डाण असणार आहे.

याबरोबरच बुधवारी दुपारी श्रीहरिकोटा अवकाश संशोधन केंद्रावरुन रिसॅट २ बीआर १ चे प्रक्षेपण होणार आहे. या अगोदर २२ मे रोजी रिसॅट २ बी चे इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या उपग्रहामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे. भारतच्या रडार ईमेजिंग क्षमता वाढणार आहे.

या उपग्रहाचे आयुष्य ५ वर्षे इतकी असणार आहे. मंगळवारी दुपारी या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरु झाली. बुधवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी हा उपग्रह आकाशात झेपावेल तेव्हा इस्रोने आणखी एक महत्वाचा टप्पा पार केलेला असेल.

Visit : policenama.com