ISRO चं उड्डाण, यंदा अंतराळात भारत पाठवणार महिला ‘रोबोट’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) आंतराळात मानवी ‘रोबो’ पाठवण्याची तयारी करत आहे. गगनयान प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इस्त्रोकडून कंबर कसण्यात आली आहे. मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी 2022 च्या सुरुवातीच्या महिन्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. गगनयान पूर्वी इस्त्रो व्योममित्र अंतराळात पाठवणार आहे. तेथे इस्त्रो मानवी शरीरांच्या क्रियांचा अभ्यास करणार आहे. एक हाफ ह्युमनॉइड म्हणजे रोबो अंतराळातून इस्त्रोला रिपोर्ट पाठवणार आहे. बुधवारी हा रोबो इस्त्रोकडून जगासमोर आणण्यात आला.

इस्त्रोचे वैज्ञानिक सॅम दयाल म्हणाले की, व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या क्रियांचा अभ्यास करुन अहवाल पाठवेल. याकडे आम्ही एक परीक्षण म्हणून पाहत आहोत. असे म्हणले जात आहे की व्योममित्र एक खास रोबो आहे, जो बोलू शकतो, माणसाला ओळखू शकतो. हा रोबो अंतराळवीर जे काम करतील त्यांची नक्कल करु शकेल.

व्योममित्र संवाद साधू शकतो आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. इस्त्रोनेच हा रोबो विकसित केला आहे. बंगळूरमध्ये हा रोबो सादर करण्यात आला. व्योममित्राने लोकांना अभिवादन करत म्हणले की, हाय, मी हाफ ह्युमनॉइडचा पहिला प्रोटोटाइप आहे. याला हाफ ह्यूमनॉइड यासाठी म्हणलं जात आहे की या रोबोला पाय नाहीत.

दयाल म्हणाले की, हा रोबो केवळ पुढे आणि बाजूला वाकू शकतो. अंतराळातून हा रोबो कमांड सेंटरच्या संपर्कात राहील. पंतप्रधान मोदींनी घोषणा केली त्यानुसार इस्त्रो 2022 च्या नियोजित वेळेच्या आतच भारताचं पहिलं मानवविरहित अंतराळ मिशन गगनयान साकरण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या अभियानाचा उद्देश भारतीयांना अंतराळ यात्रेला पाठवून सुरक्षित परत आणणे हा आहे.

इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की अंतराळ यात्रेसाठी एकूण 12 पैकी पहिले चार उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यांचे रशियातील प्रशिक्षण या महिन्याच्या शेवटी सुरु होईल. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येत आहे. परंतु इतके कळाले आहे की चारही जण भारतीय हवाई दलाचे टेस्ट पायलेट्स आहेत. 15 महिने त्यांचे प्रशिक्षण होईल. या मिशनसाठी तब्बल 10 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल.

फेसबुक पेज लाईक करा –