#ISSFWorldCup 2019 : मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांचा सुवर्णभेद

बिजींग : वृत्तसंस्था – नेमबाजी विश्वचषकात भारताने आज सुवर्णपदकाने आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. विश्वचषकातील १० मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. यजमान चीनच्या जोडीवर १६-६ अशी मात करत भारतीय जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत मनू-सौरभ जोडीने ४८२ गुणांसह पाचवं स्थान मिळवलं होतं.

चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने गुरुवारी सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले आहे. शूटिंग वर्ल्कपमध्ये अंजुम आणि दिव्यांश यांनी भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. अंजुम आणि दिव्यांश या जोडीने चीनच्या लिऊ रुक्सुअन आणइ यांग हाओरन यांच्यावर अटीतटीच्या लढतीत १७-१५ असा विजय मिळवला. त्यांच्यानंतर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात मनु भाकर आणि सौरभ चौधरीने सुवर्ण पदकावर नाव कोरले.

issf-world-cup-manu-bhaker-saurabh-chaudhary-win-gold