अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. प्राजक्ता माळीनं ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्या प्रकरणी कोर्टात खटला सुरू होता. वारंवार कोर्टात सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल ठाणे दंडाधिकारी कोर्टानं प्राजक्ताला 1 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. ड्रेस डिझायरनरला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान दंडाधिकारी कोर्टातील खटल्याविरोधात प्राजक्ता माळीनं सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

यापूर्वीही कार्टातील सुनावणीला हजर राहण्यासाठी प्राजक्ता माळीला दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. मागील सुनवणीत प्राजक्ता माळी पुन्हा एकदा गैरहजर असल्यानं तिला दुसरं समन्स बजावण्यात आलं. प्राजक्ताची ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदानं ठाणे कोर्टात याचिका दाखल केली होती.

नेमकं प्रकरण काय ?
5 एप्रिल 2019 रोजी मिरा रोडवरील मोनार्क स्टुडिओत एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान प्राजक्ता माळी आणि ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदा यांच्यात वाद झाला होता. यावेळी व्हॅनिटी व्हॅन मध्ये बोलावून प्राजक्ता माळीनं आपल्याला मारहाण केली असा आरोप जान्हवीनं केला होता. जान्हवीनं प्राजक्ता माळी विरोधात काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु याबाबत बोलताना प्राजक्ता म्हणाली होती की, जान्हवीने स्वत:च इजा करून आपल्यावर खोटे आरोप केले आहेत.

नेमकं काय घडल ?
प्राजक्ताला डिझायनर जान्हवी मनचंदा हिने दिलेले कपडे योग्य नव्हते या क्षुल्लक कारणावरून तिनं मारहाण केली आहे असा आरोप जान्हवीनं केला होता. मुख्य म्हणजे प्राजक्ता आणि जान्हवी यांच्यात याबाबत झालेल्या संभाषणाचा व्हॉट्सअ‍ॅप स्क्रिनशॉटही काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान प्राजक्ता माळीने याबाबत बोलताना मात्र तिच्यावरील आरोप हे खोटे आहेत असे सांगत सर्व आरोप फोटाळून लावले होते. याबाबत बोलताना प्राजक्त माळी म्हणाली होती की, “माझे आणि जान्हवीचे कपड्यांवरून वाद झाले होते हे खरे आहे. पंरतु तिला मी कोणत्याही प्रकारची मारहाण केलेली नाही. तिनं केलेले सर्व आरोप हे खोटे आहेत.” असे प्राजक्ता म्हणाली होती.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !