धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेतल्यानंतर देखील विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंडेंना करूणा शर्माबाबत जे सांगायचं होत ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

विरोधकांनी उगीच फाटे फोडू नयेत, मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेले तर, विषय खूप व लांब जाईल. आतापर्यंत कोणी काय लपवाछपवी केली हे सगळ्यांनाच माहिती आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे. कुणाचं लग्न झालं होत, कुणाच झाल नव्हत, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत, पण सांगायलाच हव्यात का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पुण्यात ते माध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा : पवार
शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी आम्ही महाराष्ट्रात करतच नाही. केंद्र सरकार नवीन निर्णय जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत काही करण्याची गरज नाही अशी भूमिका आहे. एकीकडे आम्हीच नियमवामली करायची आणि आम्हीच गर्दी करायची हे बरोबर नाही, तरीपण गर्दी झाली. मुंबईऐवजी चांद्यापासून बांद्यापर्यंत आंदोलने झाली असती तर ते बरे झाले असते,पण आंदोलनाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.