मुलीसोबत लैंगिक अत्याचार करणारा आयटी अभियंता अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

थेरगाव परिसरातील उच्चभ्रू राहत असलेल्या सोसायटीमध्ये आयटी अभियंत्याने सहा वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
[amazon_link asins=’B00L8PEEAI,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e859298b-b0d5-11e8-ae0d-835fe11099a5′]

मारहाण करणाऱ्या ९ पोलिसांना ७ वर्षे तुरुंगवास

चेतन कृष्णराव कामले (३६, रा. पवारनगर, थेरगाव) याला अटक केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार एक सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील जिन्याच्या मोकळ्या जागेत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन हा मूळचा नागपूर येथील असून हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत काम करतो. शनिवारी रात्री त्याने पीडित मुलीला बोलण्याचा बहाणा करून जिन्या शेजारील मोकळ्या जागेत नेले. तिथे तिच्यासोबत लैंगिक कृत्य केले. घडलेला प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. आईने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तपास वाकड पोलीस करत आहेत.

वाहतूक कोंडी सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

 

You might also like