आयटी अभियंता तरूणीला त्रास देणारा १२ तासात अटक

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाईन

आयटी अभियंता तरूणीला लग्नासाठी तगादा लावून धमकाविणाऱ्यास पिंपरी पोलिसांनी १२ तासात अटक केली आहे. याप्रकरणी संबंधित तरूणीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाईलच्या टॉवर लोकेशनची माहिती अवघ्या काही तासात मिळवत या तरूणाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नुकताच हा प्रकार घडला असून, आरोपी तरूणाची कोर्टाने जामीनावर मुक्तता केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरूणीचे आणि अटक करण्यात आलेल्याचे पूर्वी प्रेमसंबंध होते. कालांतराने या दोघांमध्ये वितुष्ट आले. त्यामुळे संबंधित तरूणी अन्य एका मुलाशी लग्न करणार आहे. परंतु, पूर्वीचा प्रियकर तिला वारंवार त्रास देत होता. त्यामुळे संबंधित तरूणी काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलिस ठाण्यात आली होती. परंतु, तेव्हा या तरूणीने अटक आरोपीबाबत तक्रार दिली नाही.

पण, आरोपी व त्याच्या वडिलांना बोलावून घेऊन समज देण्याची विनंती महिला फौजदाराकडे केली होती. त्यामुळे आरोपी व त्याच्या वडिलांना बोलावून घेण्यात आले होते. मात्र, आरोपी हा पोलिस ठाण्यात आलाच नाही. तर त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन, यापुढे मुलगा संबंधित तरूणीला त्रास देणार नाही याची हमी दिली होती.

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा संबंधित तरूणीला त्या तरूणाने त्रास दिला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आयटी अभियंता असणाऱ्या तरूणीने पिंपरी पोलिस ठाण्यात येऊन त्या तरूणाबाबत तक्रार दिली. यावेळी त्या तरूणाचा मोबाईल मात्र, बंद होता. पण तांत्रिक विभागाच्या मदतीने या आरोपीच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन शोधून काढण्यात आले. त्यानुसार त्याला अटक करून, पिंपरी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने या तरूणाची जामीनावर मुक्तता केली आहे. तांत्रिक विभागाच्या मदतीने अवघ्या काही तासात आरोपीला अटक केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like