धक्कादायक ! पुण्यातील कोथरूड परिसरात लग्नासाठी IT इंजिनिअरची भररस्त्यात प्राध्यापिकेशी ‘झोंबाझोंबी’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एका आयटी इंजिनिअर तरुणाने लग्नासाठी प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या महिलेचा पाठलाग करून भररस्त्यात तिच्याशी वाद घालून राडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोथरूड परिसरात ही घटना घडली आहे.

अरुण बाबासाहेब खडतरे (वय 33, रा. येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आयटी इंजिनिअरचे नाव आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण हा आयटी इंजिनिअर आहे. तो एका नामांकित कंपनीत नोकरीस आहे. तर फिर्यादी महिला एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. दरम्यान फिर्यादि महिलेने एका विवाह संकेतस्थळावर विवाह नाव नोंदणी केलेली आहे. दरम्यान आरोपीचे पाहिले लग्न झालेले आहे. मात्र तरीही त्याने महिलेशी संपर्क साधला. तसेच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघे भेटले. मात्र फिर्यादी यांना आरोपीचे लग्न झालेले असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी लग्न करण्यास नकार दिला.

त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देतो, नंतर लग्न करू असे सांगितले. मात्र, तरीही फिर्यादींनी लग्नास नकार दिला. यामुळे त्याला आरोपीला राग आला. तो सतत फोनद्वारे त्यांची संपर्क साधत होता. त्याला उत्तर देत नव्हत्या. दोन दिवसांपूर्वी फिर्यादी या महाविद्यालयात येत असताना त्याने पाठलाग केला. त्यांना कोथरूड भागात अडवून त्यांच्याशी वाद घातला. तसेच शिवीगाळ करून झोंबाझोंबी केली. भररस्त्यात झालेल्या या प्रकरामुळे फिर्याफी घाबरून गेल्या होत्या. त्यांनी कोथरूड पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.