‘गॅस’ पेटवणं सोपं, परंतु घराघरात ‘चूल’ पेटली पाहिजे, CM ठाकरेंचा PM मोदींवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गॅस पेटवणं सोपं आहे. परंतु घराघरात चूल पेटली पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाव घेता टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये जनतेला संबोधित करताना त्यांनी शेतकरी हिताचं बोलत असताना हे वक्तव्य केलं.

सध्या असेलल्या बेरोजगारीवरून आणि भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळावं या हेतूने अनेक उद्योग आणत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. कृषी आणि उद्योग खातं एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले, “गॅस पेटवणं सोपं आहे. परंतु घराघरात चूल पेटली पाहिजे. मी उद्योजकांना बोललो आहे की, कामगार टिकवणारे केंद्र आपल्याला हवे आहेत. उद्योग येतात. यांत्रिकीकरण होत आहे. परंतु सगळीकडे यंत्र असेल तर बाकी लोक पोट भरणार कसे. मी उद्योजकांना म्हटलो आहे की, तुम्ही उद्योग घेऊन या. परंतु भूमिपुत्रांना रोजीरोटी देण्याची जबाबदारी तुमची आहे.”

यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचंही प्रतिपादन केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, “अनेकजण येतात आणि विविध योजनांचे उद्घाटन करतात. पुढे त्याचे काम होताना दिसत नाही. मी केवळ फीत कापण्यासाठी आलेलो नाही. मी राज्यातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारच. जागतिक मंदी आणि देशात बंदी आहे म्हणून आपण रडायचं नाही. आपल्या राज्याला रडायचा नाही तर लढायचा इतिहास आहे. आता जगाला परदेशी बनावटीच्या वस्तूंची नाही तर मेड इन इंडियाची भुरळ पडली पाहिजे.” असेही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/