‘गडकरी साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा; अपेक्षा आहे राजकारण करणारे, हा सल्ला मानतील’ – आ. रोहित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एकीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले आहे आणि दुसरीकडे देशात आणि राज्यात सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस भिडले आहेत. यावरून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. गडकरी यांचा हवाला देत आमदार रोहित पवार यांनीही भारतीय जनता पक्षाला सल्ला दिला आहे.

आ. रोहित पवार म्हणाले की, कोरोनाची लढाई लढत असताना आजच्या अडचणीच्या काळात कुणीही राजकारण करू नये, हा सन्माननीय नितिन गडकरी साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. ते देशातले मोठे नेते आहेत. माझ्यासारखे अनेकजण त्यांच्याकडून शिकत असतात. अपेक्षा आहे राजकारण करणारे, त्यांचा हा सल्ला मानतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

या दरम्यान, राजकारण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खडे बोलं सुनावत, रविवारी नागपूर कार्यकारिणी बैठकीत गडकरी यांनी कार्यकर्त्यांना साथीच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिले. यावेळी पक्षाने बरीच कार्यकर्ते गमावली आहेत, यामुळे, प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे आणि समाजसेवा करताना राजकारण करू नये, असे आवाहन देखील गडकरी यांनी केले होते. पुढे ते म्हणाले होते, राजकारण म्हणजे केवळ सत्तेत राहणे नव्हे तर ते सामाजिक कार्य आणि राष्ट्रवाद आहे, ‘आपण जाती, धर्म किंवा पक्षाचा विचार न करता समाज आणि गरिबांच्या पाठीशी उभे राहून सर्वांना मदत केली पाहिजे.