‘नेत्यांनी शिकलेलं असण्याची गरज नाही’, भाजप मंत्र्याचं ‘अजब’ विधान (व्हिडीओ)

नवी : दिल्ली वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश सरकारमधील तुरुंग राज्यमंत्री असणाऱ्या जयकुमार सिंह जॅकी यांनी एक विचित्र विधान केलं आहे. सध्या आपल्या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. शिकलेले लोक वातावरण बिघडवण्याचं काम करतात. त्यामुळे नेत्यांनी शिकलेलं असणं गरजेचं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

सितापूर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना तुरुंग राज्यमंत्री जयकुमार सिंह जॅकी म्हणाले, “नेत्यांनी शिकलेलं असणं गरजेचं नाही. याची काहीही आवश्यकता नाही. मी एक मंत्री आहे. माझ्याकडे एक खासगी सचिव असतो, कर्मचारी असतात. तुरुंग मला थोडीच चालवायचं असतं. त्यासाठी तुरुंग अधीक्षक असतात, तुरुंगाधिकारी असतात. त्यांनाच तुरुंगाची व्यवस्था चालवायची असते. मला तर हे वाटतं की, तुरुगांत चांगलं जेवण बनावं. तुरुगांची व्यवस्था चांगली असावी. नेत्यांनी शिकलेलं असण्याची गरज नाही, त्यांना केवळ दूरदृष्टी असायला हवी.” असंही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like