रुग्णांच्या आकड्यापेक्षा किती मृत्यू, किती रुग्ण बरे झाले याला महत्त्व : अमिताभ कांत

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाउन लागू करून अनेक दिवस होऊन गेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन यासारख्या उपयांमुळे परिस्थिती सुधारत आहे पण तिचा एकूणात काय परिणाम झाला आहे हेही आता तपासूून पाहिले जात आहे. जगभरातील रुग्णांची संख्या वाढतच आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘कोरोनाच्या रुग्णांच्या एकूण संख्येला नाही तर किती मृत्यू झााले आणि किती रुग्ण बरे झाले तसंच कितींची तब्येत गंभीर आहे याच्या संख्येला अधिक महत्त्व आहे. मृत्यू दर आणि बरे झालेले रुग्ण या दोन्हींमध्ये आपली स्थिती चांगली आहे. आपल्या देशात 10 लाखांत 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 10 लाखांत 275 तर स्पेनमध्ये 591 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फ्रान्सचा कोरोना मृत्यूदर 16 टक्के आहे त्या तुलनेत भारताचा कोरोना मृत्यू दर 3 टक्के आहे.’ भारतातील उपलब्ध आरोग्य व्यवस्था, भारताची लोकसंख्या आणि भूमीचा विस्तार या सर्व गोष्टी लक्षात घेता भारतातील मृत्यूदर आटोक्यात आहे. त्यामुळे मृत्युदराची तुलना करणंच योग्य आहे.