Rakshabandhan 2020 : जेव्हा लक्ष्मी मातेने राजा बळीला बांधली राखी, तेव्हा मुक्त झाले भगवान विष्णू

Rakshabandhan 2020 : रक्षाबंधनाचा सण 3 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. हा बहिण-भावाच्या प्रेमाचा सण आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. पौराणिक कथांमध्ये सुद्धा रक्षाबंधनाचा उल्लेख आहे. एकदा लक्ष्मी मातेने राजा बळीला आपला भाऊ बनवून भगवान विष्णूंना त्यांनीच दिलेल्या वचनातून मुक्त केले होते. यावेळी रक्षाबंधणाला वाचा ही पौराणिक कथा…

लक्ष्मी मातेने सर्वप्रथम राजा बळीला बांधली राखी
पौराणिक मान्यतानुसार, लक्ष्मी मातेने राजा बळीला सर्वप्रथम राखी बांधली. एकदा राजा बळीने 100 यज्ञ पूर्ण करून स्वर्गावर वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला, यामुळे इंद्रदेव घाबरले. ते भगवान विष्णु यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे रक्षण करण्याचे निवेदन केले. तेव्हा भगवान विष्णु यांनी वामन अवतार धारण केला.

ते वामन अवतारात राजा बळीकडे गेले आणि भिक्षेमध्ये तीन पाऊल जमीन मागितली. बळीने तीन पाऊल जमीन देण्याचे वचन दिले. तेव्हा भगवान विष्णु यांनी दोन पावलातच संपूर्ण पृथ्वी पूर्ण केली. हे पाहून राजा बळी समजला की, हा वामन व्यक्ती कुणी साधारण असू शकत नाही. त्यांनी तिसरे पाऊल टाकण्यासाठी आपले डोके पुढे केले. हे पाहून भगवान विष्णु राजा बळीवर प्रसन्न झाले आणि त्यास वर मागण्यास सांगितले आणि सोबतच त्यांनी बळीला पाताळ लोकात राहण्यास राहण्यास सांगितले.

तेव्हा राज बळीने म्हटले हे प्रभू! अगोदर आपण वचन द्या की, जे मागेन ते आपण द्याल. फसवणार नाही. भगवान विष्णुंनी तसे वचन दिले. तेव्हा बळीने म्हटले, मी पाताळ लोकात तेव्हाच राहीन, जेव्हा तुम्ही नेहमी माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभे राहाल. हे ऐकून विष्णू भगवान विचारात पडले. त्यांनी विचार केला की, राजा बळीने तर त्यांना पहारेकरी बनवले.

आपल्या वचनात अडकलेले भगवान विष्णू सुद्धा पाताळ लोकात राजा बळीसोबत राहू लागले. इकडे लक्ष्मी माता भगवान विष्णूंची वाट पहात होती. मोठा कालावधी सरला तरी नारायण आले नाहीत. याच दरम्यान नारदांनी सांगितले की, ते तर दिलेल्या वचनामुळे राजा बळीचे पहारेकरी बनले आहेत. लक्ष्मी मातेने नारदांना उपाय विचारला, तेव्हा ते म्हणाले की, तुम्ही राजा बळीला भाऊ बनवा आणि त्याच्याकडून रक्षणाचे वचन घ्या.

तेव्हा लक्ष्मी मातेने एका महिलेचे रूप धारण केले आणि लक्ष्मी माता राजा बळीकडे गेली. एक महिला रडत असल्याचे पाहूत बळीने तिला रडण्याचे कारण विचारले. तीने म्हटले तिला कुणीही भाऊ नाही. यावर बळीने त्या महिलेला आपली धर्म बहिण बनवण्याचा प्रस्ताव दिला. ज्यावर लक्ष्मी मातेने बळीला रक्षासूत्र बांधले आणि रक्षण करण्याचे वचन घेतले. शिवाय बळीकडून दक्षिणेत लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना मागितले.

अशाप्रकारे लक्ष्मी मातेने बळीला रक्षासूत्र बांधून भाऊ बनवले, सोबतच भगवान विष्णूंना सुद्धा दिलेल्या वचनातून मुक्त केले.