निरोगी शरीर आणि मनाच्या उत्साहासाठी घ्या ‘शांत आणि दीर्घ’ श्वास

पोलीसनामा ऑनलाईन टीम – जगण्यासाठी प्रत्येकाला श्वास घ्यावाच लागतो. अगदी जन्माला आल्यापासून या जगाचा निरोप घेईपर्यंत सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे श्वासोच्छवास होय. श्वास म्हणजे जीवन. परंतु, या श्वासाकडे आपण कधीही गांभीर्याने पाहात नाही. याबाबत कुणी काही सांगतही नाही. जमेल तसा, सुरू आहे तसा श्वास घेतला जातो. मात्र, श्वास हा शांतपणे आणि दीर्घ घेणे अतिशय महत्वाचे आहे. माणसाचं जगणं अबाधित ठेवणारा हा विश्वास किती महत्वाचा आहे, तो कसा घ्यावा आणि त्याचे महत्व काय? याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

दीर्घ आणि शांतपणे श्वास घेतल्यास हृदय चांगल्या प्रकारे काम करते. यामुळे मनदेखील प्रफुल्लित होते. मनातील विचारांचा गोंधळ संथ होतो, त्यांच्यात सुसूत्रता येते. शिवाय दीर्घ श्वासाने शरीराला भरपूर प्रमाणात प्राणवायू मिळतो. मेंदूला रक्तपुरवठा करण्यात प्राणवायू अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मुळात श्वास घेण्याच्या प्रक्रियेकडे आपले लक्षच नसते. काही भावनिक प्रसंगी आपला श्वास कमी जास्त होत असतो. धावताना श्वास मोठ्याप्रमाणात घेतला जातो. उत्सुकता, भीती अशा प्रसंगीही श्वास जास्त घेतला जातो.

प्रत्येकाचे शरीर आणि श्वास घेण्याची क्रिया यांचा निकटचा संबंध आहे. आपल्या बसण्याच्या स्थितीचाही श्वास घेण्याच्या क्रियेवर परिणाम होत असतो. आपण एका मिनिटात किती श्वास घेतो हे मोजावे. एका मिनिटाला बारा ते अठरा वेळा श्वास घेतला जातो. यापेक्षा जास्त श्वास घेतला जात असेल तर चांगलेच आहे. दीर्घ श्वास घेण्याचा सतत सराव केल्यास शरीराला दीर्घ श्वास घेण्याची सवय होऊ शकते.
दीर्घ श्वास घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मनावरचा ताण हलका होतो. उत्साह वाढतो. व्यायाम करताना ताठ बसावे व सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करावे. दीर्घ श्वास घेण्यासाठी सराव केला पाहिजे. यासाठी पाहिला सरावात डोळे मिटून शांतपणे दीर्घ श्वास घ्या. आपण श्वास घेतोय आणि सोडतोय याकडे बारकाईने लक्ष द्या.

दुसरा सराव म्हणजे दोन्ही हात एकमेकांवर घासून ते डोळ्यांवर ठेवा. ती शांत ऊब डोळ्यांना अनुभवू द्या. तिसरा सराव करताना डोळे मिटून काही सेकंदासाठी श्वास रोखून धरा आणि मग हळूवारपणे श्वास सोडा. चौथा सराव करताना हात पोटावर ठेवून दीर्घ श्वास घ्या. पोटाची हालचाल कशी होते हे तुम्हाला पाहता येईल आणि सराव म्हणजे नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडावा. एक हलकीशी शिट्टी वाजेल असे करावे. या सरावामुळे खुप उत्साह संचारल्या सारखे वाटते.

Loading...
You might also like