IT Raid In Pune | पुण्यातील निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर आयकर विभागाचे छापे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IT Raid In Pune | पुणे शहरातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्सवर (Neelkanth Jewellers) आयकर विभागाची गुरुवारी (दि.19) सकाळपासूनच छापेमारी (IT Raid In Pune) सुरु झाली आहे. शहरातील हडपसर (Hadapsar), मगरपट्टा (Magarpatta) आणि बाणेर (Baner) येथील दुकानांसह घरामध्ये देखील आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. आयकर विभागाकडून पहाटेपासूनच धाडसत्र सुरु आहे.

छापेमारीसाठी आयकर अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा शहरात आला आहे. आयकर विभाकाचे 40 अधिकारी छापासत्रासाठी दाखल झाले आहेत. पुण्यातील नीलकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाने पाहाटेपासून छापेमारी सुरु केली असल्याचे समोर आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (IT Raid In Pune)

अनेकदा ज्वेलर्सच्या दुकानातून जीएसटीच्या पैशांचा भरणा केला जात नाही, अथवा रोख स्वरुपात मोठ्या प्रमणात
व्यवहार केले जातात. अशाच व्यवहारातील तफावतीची माहिती नीलकंठ ज्वेलर्स संदर्भात आयकर विभागाकडे होती.
या माहितीच्या आधारे गुरुवारी पहाटेपासूनच आयकर विभागामार्फत छापेमारीला सुरुवात करण्यात आली.
दुकानातील कागदपत्रांची तपासणी सध्या सुरु आहे. ही कारवाई किती वेळ सुरु राहील हे अद्याप समजू शकले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | पवारांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटलांची सभा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद

Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप

Drug Mafia Lalit Patil | ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे देऊन मॅनेज केलं, ललित पाटीलच्या चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर