IT Raid On Retired IPS Officer | बेसमेंट, 650 लॉकर आणि कोट्यवधी रुपये ! वाचा माजी IPS च्या घरावरील छापेमारीची संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IT Raid On Retired IPS Officer | दिल्ली-एनसीआरला (Delhi-NCR) लागून असलेल्या नोएडा (Noida) येथील सेक्टर 50 मधील एका माजी आयपीएस अधिकार्‍याच्या (IT Raid On Retired IPS Officer) घरावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकून आतापर्यंत अनेक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तीकर विभागाला माहिती मिळाली होती की, नोएडा येथील एका घरात चालवल्या जाणार्‍या फर्म अंतर्गत खाजगी लॉकरची सुविधा आहे; जिथे अनेक कोटी रुपये ठेवले आहेत.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) अनेक लोकांची यादी तयार केली आहे. या यादीत समावेश असलेले लोक निवडणुकांमध्ये हवालाचा पैसा वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. यासाठी प्राप्तीकर विभागाचे पथक नोएडाशिवाय वाराणसी आणि जौनपूरमध्ये शोध मोहिमेसाठी गेले होते.

 

माहितीच्या आधारे प्राप्तीकर विभागाचे पथक नोएडा येथील सेक्टर 50 मध्ये असलेल्या माजी आयपीएस अधिकार्‍याच्या घरी शोध मोहिमेसाठी आले होते. या कारवाईदरम्यान अधिकार्‍याच्या घरातून नोटांचे अनेक बंडल जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात होता, तसतशी नोटांच्या बंडलांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. (IT Raid On Retired IPS Officer)

 

एका वृत्तानुसार, प्राप्तीकर विभागाला माहिती होती की नोएडाच्या सेक्टर 50 मध्ये असलेल्या घराच्या तळघरात अनेक कोटी रुपये रोख ठेवण्यात आले आहेत.
त्यानंतरच्या छाप्यांमध्ये असे आढळून आले की, माजी आयपीएस अधिकारी एका फर्मच्या अंतर्गत खाजगी लॉकरची सुविधा देत आहे.
घरात मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने सर्व लॉकर उघडण्याचे काम प्राप्तीकर विभागाकडून केले जात आहे.

या इमारतीच्या तळघरात 650 लॉकर्स सापडले आहेत. ज्यामध्ये 2000 आणि 500 रू. च्या नोटा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत.
या पैशांचा बेनामी मालमत्तेशी काही संबंध आहे की नाही याचा तपास विभाग करत आहे.
मात्र, माजी आयपीएस अधिकार्‍याच्या घरावर टाकलेल्या या छाप्याबाबत प्राप्तीकर विभागाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडातील सेक्टर 50 मध्ये असलेल्या माजी अधिकार्‍याच्या घरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
छापेमारी पूर्ण होताच प्राप्तीकर विभाग आणि तपासाशी संबंधित अधिकारी या प्रकरणाची संपूर्ण माहिती देतील.

 

 

Web Title :-  IT Raid On Retired IPS Officer | income tax raids on ex ips officer premises noida unaccounted cash recovered

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Station Platform Ticket | पुणेकरांना दिलासा ! प्लॅटफॉर्म तिकीट दर पुन्हा 50 रूपयांवरून 10 रूपये

 

Ajit Pawar | ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधून सापडणार नाही’, अजीत पवारांची टीका

 

Maharashtra Temperature | राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका ! जळगावात तापमान 7 अंशावर, पुण्यात पारा घसरला