IT Sector Freshers | जॉब प्लेसमेंट तर झाले, परंतु ऑफिसमध्ये ज्वायनिंगचा नाही पत्ता, IT सेक्टरचे फ्रेशर्स त्रस्त, कर्मचाऱ्यांच्या संख्येत 63,759 ने घट

IT Sector Freshers | india it sector big companies are showing major onboarding delay issues for freshers marathi news

नवी दिल्ली : IT Sector Freshers | भारतात आयटी सेक्टर सर्वात जास्त नोकरी देणारे सेक्टर म्हणून ओळखले जाते, परंतु फ्रेशर्ससाठी काही काळापासून ऑनबोर्डिंगमध्ये उशीर होण्याची समस्या निर्माण झाली आहे. म्हणजेच फ्रेशर्सला कॅम्पस प्लेसमेंट अथवा इतर पद्धतीने हायर तर करण्यात आले होते, पण अजूनपर्यंत त्यांचे ज्वायनिंग झालेले नाही. काही प्रकरणात तर ही तक्रार दोन वर्षांपेक्षा जास्त विलंब झाल्याबाबत देखील आहे.

इंग्रजी न्यूज पोर्टल टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मागील दोन वर्षात भारतात किमन १०,००० फ्रेशर्सला नोकरीची ऑफर दिली गेली होती, परंतु त्यांना अजुनपर्यंत आयटी कंपन्यांनी कार्यालयामध्ये वर्कफोर्समध्ये सामावून घेतलेले नाही. यासाठी आयटी कर्मचारी संघ नेसेंट इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉईज सीनेट (एनआयटीईएस) च्या आकड्यांचा संदर्भ देण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, आयटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष हरप्रीत सिंह सलूजा यांनी म्हटले की, ज्या उमेदवारांना टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, जेन्सर आणि एलटीआयमाइंडट्रीसह कंपन्यांमध्ये पोझीशन ऑफर झाली होती, परंतु अजूनपर्यंत ज्वायनिंग झालेले नाही. त्यांनी लेबर यूनियनला ऑनबोर्डिंगला होत असलेल्या विलंबाबत तक्रार केली आहे. या तक्रारींमध्ये टॉप लेव्हल आणि मिड लेव्हल दोन्ही आयटी कंपन्यांचा समावेश आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नॉर्थ अमेरिका आणि यूरोपमध्ये असलेली व्यवसायिक अनिश्चितता हे कारण या विलंबासाठी सांगण्यात येत आहे. येथे आर्थिक मंदीच्या संकेतांनी कस्टमर्सला आयटी खर्चांबाबत अलर्ट केले होते, त्याचा परिणाम नवीन हायरिंगवर सुद्धा दिसत आहे.

तीन प्रमुख आयटी कंपन्यांच्या कर्मचारी संख्येत घट
टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या प्रमुख आय कंपन्यांनी अलिकडेच आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी आपल्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या निकालांची घोषणा केली.

या सर्वांनी संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आपल्या एकुण कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट नोंदवली आहे. एकुण तीन मेजर सॉफ्टवेयर सेवा एक्सपोटर्सने पूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या संख्येत ६३,७५९ ची घसरण नोंदवली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे शहरात विनापरवानगी अवजड वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करा, शरद पवार गटाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Ajit Pawar NCP – Devendra Fadnavis BJP | पुण्यातील दोन जागांवर अजित पवार गट आणि भाजपात जुंपली; निर्णयाकडे लक्ष

Sunetra Ajit Pawar | राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य; निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांची नाराजी

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Kale Padal police arrests man who stole 15 cars worth Rs 19 lakh from Khadi Crushing Plant; The theft was done with the help of a worker from Khadi Crushing Plant (Video)

Pune Crime News | खडी क्रशींग प्लांटमधील 19 लाखांच्या 15 मोटारी चोरणाऱ्यास काळे पडळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खडी क्रशींग प्लांटमधील कामगाराच्या मदतीने केली होती चोरी (Video)

Pune Crime News | Two thieves beat up a young man carrying a gold string for a mangalsutra and stole gold worth Rs 3 lakhs, the incident happened in the evening during the rush hour in Liyavar Peth (Video)

Pune Crime News | मंगळसुत्रासाठीची सोन्याची तार घेऊन जाणार्‍या युवकाला मारहाण करुन दोघा चोरट्यांनी 3 लाखांचे सोने नेले चोरुन, रविवार पेठेतील ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळची घटना (Video)