आलिया व रणबीरच्या नात्यात अंतर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर व आलिया भट्ट या दोघांच्या नात्याची चर्चा आहे. दोघांनाही एकमेकांच्या घरचे पसंत करताना दिसत आहेत. फक्त आता आलिया वधू बनायचीच राहिली आहे असेही काही दिवसांपूर्वी म्हटले जात होते. इतकेच काय तर रणबीर कपूर व आलिया भट्ट या दोघांनी त्यांच्यातील अफेअरची कबुली मीडियासमोर दिली होती. दीप-वीर, निक-यांका, विरुष्का या प्रसिद्ध जोड्यांच्या लग्नानंतर आता रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये चर्चाही सुरू होती. परंतु त्यांच्या नात्यात सर्व काही ठिक नसल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर स्व:तच आलियापासून दूर राहत आहे. याचे कारणही खुद्द आलियाच आहे. दोघांचं नात अजून घट्ट व्हावं, यासाठी आलिया प्रयत्न करत आहे. यासाठी ती सतत रणबीरला काॅल, मेसेजेस करत आहे. मात्र, तिचा हाच स्वभाव रणबीरला खटकत असल्यामुळे तो तिच्यापासून लांब राहतोय. रणबीरच्या अशा वागण्यावर आलियादेखील नाखूश असल्याचं समजतं.

आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या नात्याला कपूर परिवारानेदेखील स्वीकारले आहे. या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या या नात्यामधील रुपांतर विवाह बंधनात व्हावे, अशी कपूर परिवाराची इच्छा आहे. त्यामुळे या दोघांमधील नात्याचं पुढे काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान आता आलिया आणि रणबीर नेमकं काय पाऊल उचलतील याची सर्वांना उत्सुकता असल्याचे दिसत आहे.