IT कर्मचार्‍यांच्या Work Form Home चा घर मालकांना मोठा आर्थिक फटका !

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. कोरोना संसर्गामुळे सध्या खासगी कंपन्या, आयटी कंपन्यांमधील कर्मचारी Work Form Home करत आहे. त्यांनी भाड्यांची घरे सोडली आहेत. काहीजण आपल्या मूळगावी Work Form Home करत आहे. परिणामी, याचा भुर्दंड शहरातील घर मालकांना बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचं शहर म्हणून ओळखलं जातं. हिंजवडी भागात आयटी कंपन्या आल्यामुळे शहरात देशभरातून चाकरमानी रोजगारासाठी आले. कोरोनामुळे जवळपास ९ महिने झाले वर्क फ्रॉम होम सुरू आहे. याचा मोठा आर्थिक फटका या भागातील उद्योगांवर झाला आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचारी आपल्या मूळ गावातून काम करत आहेत.

कोरोनाच्यापूर्वी हिंजवडी आणि परिसरात भाड्यानं फ्लॅट मिळण कठीण होतं. मागणी जास्त असल्यानं भाडेदेखील वाढलं होतं. कोरोनामुळे शहरातील बहुतांश फ्लॅट रिकामे झाले आहेत. त्यामुळे आता भाडे कमी झाले आहेत. हिंजवडी भागात अनेकांनी उत्पन्न मिळावं म्हणून फ्लॅट भाड्यानं देण , हॉस्टेल, रूम भाड्यानं देण आदी व्यवसाय कर्ज काढून सुरू केलं आहेत. परंतु, सध्या भाडेकरू नसल्यानं या लोकांचं उत्पन्न थांबले आहे. सर्वच नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी आवश्यक लागणारे साहित्य दिले आहेत. पुढील काही दिवस वर्क फ्रॉम होम सुरूच राहणार अशी शक्यता आहे.

वर्क फ्रॉम होम असल्यानं बहुतांश कर्मचारी गावी गेले आहेत. ८० टक्के कर्मचारी भाड्याने राहत होते. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. हिंजवडी भागातील हॉस्टेल्स सध्या रिकामे आहेत. रिअल इस्टेट व्यवसायाला याचा फटका बसला आहे.
संतोष मांदळे, रिअल इस्टेट एजंट

भाडे झाले कमी
पूर्वी                                   आता
१ बीएचके १२ हजार             ८ ते ९ हजार
२ बीएचके १५ ते १७ हजार    १२ हजार