सोनिया गांधींनी सांगतले देश वाचवण्यासाठी ‘हीच ती वेळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, देशाच्या प्रदीर्घ काळापासून परिस्थिती गंभीर झाल्याचे आपण सर्वजण येथे आलो आहोत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. घराबाहेर पडून त्याविरोधात आंदोलन करण्याची जबाबदारी आपली आहे, आज तीच वेळ आहे. देश वाचविण्यासाठी आपल्याला कठोर संघर्ष करावा लागेल असे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावरून केले. त्या भारत बचाव रॅलीत बोलत होत्या.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे छोटे व्यापारी उद्धवस्त झाले आहेत. त्यांना बँक कर्ज देण्यास सक्षम नाहीत, संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आज तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत, जी यापूर्वी कधीही आली नाही. नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांच्या डोळ्यासमोर अंधार असल्याचा घणाघात त्यांनी केला.

सोनिया गांधी म्हणाल्या, आज जेव्हा मी शेतकरी बांधवांची अवस्था पाहते तेव्हा खूप त्रास होतो. त्यांना आपल्या शेतात योग्य वेळी बियाणे मिळत नाही. त्यांना सहज खत मिळत नाही. पाणी आणि वीज उपलब्ध नाही. ते हिवाळा आणि उन्हाळ्याची पर्वा न करता काम करत राहतात. तरी देखील त्यांना दोन वेळची भाकरी मिळत नाही असेही सोनिया गांधी म्हणाल्या. आज महिलांवर होणारे अत्याचार पाहून शरमेने आमची मान खाली जाते. अंधेरी नगरी चौपट राजा असे वातावरण देशात आहे. सबका साथ सबका विकास कुठे आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/