गुटखा वाईट आहे, हे कळायला 30 वर्षे गेली – माजी आयुक्त महेश झगडे

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

गुटखा वाईट असून तो कर्करोगाला कारणीभूत आहे, हे कळायला 30 वर्षे गेली. त्याचप्रमाणे आॅनलाईन आैषधे विक्रीच्या बाबतीत 30 वर्षांनी दुष्परिणाम पहायला मिळाल्यास पुन्हा काय करणार? कोट्यावधी प्रिस्क्रिप्शन आॅनलाईन कशी तपासणार? याप्रश्नी आैषध विक्रेत्या संघटना, ग्राहक संघटना उशिरा जाग्या झाल्या आहेत. असे मत अन्न व आैषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले. ते ‘पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आॅनलाईन आैषध विक्री- योग्य की अयोग्य’ या महाचर्चेत बोलत होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’93798391-c270-11e8-ad95-6f89627ae631′]

यावेळी झगडे म्हणाले, दरवर्षी एक लाख नागरिक चुकीच्या आैषधांमुळे मरतात. आैषधे हे जीव वाचवतात, तसेच ते जिवघेणेही आहेत. आॅनलाईन खरेदीमुळे आैषध खरे आहे की खोटे, आैषध तयार करणारे फार्मासिस्ट आहेत की नाही हे समजत नाही. त्यामुळे आॅनलाईन आैषधे खरेदी करणे धोक्याचे आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी देण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
आॅनलाईन आैषध विक्री प्रतिनीधी बोरा म्हणाले की, ज्यांना जुनाट रोग आहेत, महिण्याला ठराविक आैषधे घ्यावी लागतात, अशा ग्राहकांना आॅनलाइन आैषध खरेदी करणे फायद्याचे आहे. ठराविक वेळेला आैषधे मिळतील. आॅनलाईन आैषध विक्रेते देखील शासनाकडून प्रमाणित करण्यात आलेले, आणि प्रशिक्षित असतात.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a775eaf-c270-11e8-a13a-8fe9720bf542′]
यावेळी महाचर्चा सत्रात, हदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे,  जनरल प्रॅक्टीशनर डॉ. चंद्रकांत परुळेकर, सायबर क्राईम प्रमुख राधिका फडके, औषध विक्रेता राष्ट्रीय संघटना सदस्य वैजनाथ जागुष्टे, औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील, ग्राहक पेठ कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ऑनलाईन औषध विक्रेते ईझी फार्मा चे संचालक अनिकेत बोरा, आऊटसोर्सिंग प्रायव्हेट एस. वाय.एस. लॉजिक लिमिटेड चे  संचालक समीर गोडबोले यांचा सहभाग होता.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी