‘सनबर्न’साठी 5 सोपे घरगुती उपाय ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सनटॅनिंग किंवा सनबर्न ही एक कॉमन समस्या आहे. यामुळं काही वेळासाठी स्किन ड्राय होते. याशिवाय टॅनिंगमुळं स्किन आणखी खराब दिसते. सनबर्ननंतर त्वचेमधील तेलीय ग्रंथींमधून आणखी तेल निघू लागतं. यामुळं स्किन जास्त ऑईली दिसू लागते. यापासून बचाव करण्यासाठी आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

1) सनस्क्रिन – उन्हामध्ये घरातून बाहेर पडण्याआधी चांगल्या कंपनीचं सनस्क्रिन लावा जेणेकरून सुर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं नुकसान होणार नाही.

2) कोरफडीचा गर – सनबर्न झाल्यानंतर त्वचा थंड पाण्यानं धुवून काढा. यावर कोरफडीचा गर लावा. याने फायदा होईल.

3) बटाट्याचा रस – सनबर्न झालं असेल तर बटाट्याचा रस आणि ओटमील पॅकही जास्त फायदेशीर ठरतो.

4) ग्रीन टी – एक कप पाण्यात एक ग्रीन टीची बॅग काही वेळासाठी टाकून ठेवा. एखाद कापडं किंवा कापसाच्या मदतीनं हे पाणी सनबर्न झालेल्या ठिकाणी लावा.

5) पाणी जास्त प्या – सनबर्नमुळं डिहायड्रेशन होऊ शकतं. यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांचा अ‍ॅलर्जीही असते.