माता रमाईमुळेच बाबासाहेब क्रांती योद्धा बनु शकले : राजश्री मखरे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सुखदुःखात सहभागी राहुन त्यांचे जीवन घडवितांना त्यांना सदैव प्रोत्साहन देत क्रांतीचा लढा उभारण्यासाठी सावली बनुन बाबासाहेबांना महान क्रांतियोद्धा बनविणारी माता रमाई आंबेडकर या खरोखरच एक युगनिर्माती असल्याचे मत इंदापूर नगरपरिषदेच्या महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांनी शहरातील आंबेडकरनगर येथील जेतवन बुद्धविहार येथे बोलताना व्यक्त केले.

इंदापूर शहरातील आंबेडकरनगर, जेतवन बुद्ध विहार येेथे इंदापूर शहर नागरिकांच्यां वतीने रमाई आंबेडकर यांचा जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नगरसेविका राजश्री मखरे बोलत होत्या. जगाच्या इतिहासात प्रत्येक कर्तबगार पुरुषांच्या कर्तुत्वात त्यांच्या पाठीराख्या स्त्रीचा सहभाग मोलाचा असल्याचे असल्याचे सांगीतले. याप्रसंगी माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्रा.अशोक मखरे, ॲड. किरण लोंढे, बाळासाहेब मखरे, हौसाबाई मखरे, सरस्वती सोनवणे इत्यादी प्रमुख उपस्थित होते. जेष्ठ महिला नागरिक सरस्वती सोनवणे यांचे हस्ते रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.व माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कुमारी विवेका मखरे हिने माता रमाई आंबेडकर यांचा जीवनपट सांगितला.माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वतच्या मालकीचे एक एकर ज्वारीचे पिक हे रानपाखरांना चार्‍यासाठी राखून ठेवणा-या सरस्वती सोनवणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी रोहित ढावरे, अक्षय मखरे, सुहास मखरे, उमेश ढावरे, सुरेश मखरे, विशाल मखरे, अभिजित अवघडे, दत्तात्रय शिंदे, विजय भंडलकर, धम्मपाल सरवदे, राजू मखरे, संभाजी मखरे, अनार्य मखरे, विकी मखरे, हौसाबाई मखरे, उषा मखरे, पद्मिनी मखरे, वत्सला मखरे, मीना मखरे, तप्ताबाई मखरे, शारदा मखरे, वैशाली साबळे, शितल गाडे, उज्वला मखरे, आम्रपाली मखरे, जयमाला सोनवणे, प्रमिला मखरे, उमा मखरे, माया मखरे, अनिता मखरे, नंदा मखरे, रोहिणी मखरे, काजल लोंढे, शोभा मखरे, शैला मखरे, शोभा कांबळे, अश्विनी काकडे, ज्योती साबळे, प्रतिक्षा मखरे, करुणा मखरे, विवेका मखरे, सम्यका मखरे, अनुष्का काकडे, प्रज्ञा मखरे, समृद्धी मखरे, स्वरांजली मखरे, यशस्वी मखरे, आर्या मखरे, जिया मखरे, श्रेया गाडे, साक्षी मखरे इत्यादी उपस्थितीत होते.