राज्यपालांना आजही पाठिंब्याचे पत्र देणं ‘अवघड’, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसपुढे ‘पेच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना देणे अवघड असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याचे पत्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला काल देणे शक्य झाले नाही. राज्यपालानी ज्यांचा पाठिंबा आहे, त्या सर्व आमदारांचे नाव, त्यांचा मतदारसंघ व त्यांचा पाठिंबा असल्याचे सहीचे पत्र देण्यास सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे आपापल्या मतदारसंघात आहेत. त्या सर्वांना बोलावून आज सायंकाळपर्यंत त्यांच्या पाठिंब्याचे पत्र गोळा करणे अवघड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना वाटत आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र देणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे आमदार हे जयपूर येथे आहेत. त्या सर्वांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन ते जयपूरहून मुंबईला कोणीतरी यावे लागणार आहे. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते आज दिल्लीतून जयपूरला जात आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांचे पत्र कोणा तरी नेत्याला घेऊन यावे लागणार आहे. ते अजून ठरलेले नाही. आजही सत्ता स्थापनेबाबत निर्णय होण्याची शक्यता दिसून येत नाही.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like