काय सांगता ! होय, शरद पवारांना होतोय ‘या’ गोष्टीचा ‘पश्‍चाताप’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (दि.18) बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली. आष्टी विधानसभा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, आता शरद पवारांनी मी उमेदवारांची घोषणा करणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करून मी चूक केली असे त्यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदार संघातून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, माजलगाव मधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी यावेळी घोषीत केली होती. मात्र, त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करू असे म्हणाले होते.

उमेदवारांच्या घोषणेबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी यादी जाहीर करून माझी चूक झाली असे म्हटले. उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. प्रदेशाध्यक्षाने उमेदवार जाहीर करायला हवे होते. पण लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले असे शरद पवार यांनी म्हटले आहे. उमेदवारांची घोषणा करणे हे प्रदेशाध्यक्षांचे काम आहे. मात्र, बीड येथील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आग्रह पाहूनच मी उमेदवारांची घोषणा केल्याचे पवारांनी सांगितले.

Visit – policenama.com 

 

You might also like