‘मुख्यमंत्री’पद वाटून घेण्याचं ‘ठरलं’ नव्हतं : नितीन गडकरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सरकार स्थापनेचा पेचप्रसंग निर्माण झाला असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत येऊन राजकीय स्थितीचा आढावा घेतला आणि मुख्य मंत्रीपद अडिच अडिच वर्षासाठी भाजप आणि शिवसेनेत वाटून घ्यायचे असे ठरले नव्हते हे स्पष्ट केले.

याखेरीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हेसुद्धा यापूर्वीच ठरले होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनेल असेही गडकरी यांनी सांगितले. फडणवीस पक्षात एकाकी पडले असे चित्र निर्माण झाले, गडकरी यांच्या स्पष्ट भूमिकेने केंद्रीय नेतेही फडणवीस यांच्या पाठिशी आहेत हेही दिसून आले आहे.

सरकार बनविण्यासाठी मध्यस्थीची तयारी गडकरी यांनी दाखविली. सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा सरसंघचालक मोहन भागवत यांचा संबंध अजिबात नाही असेही गडकरी यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

You might also like