पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ गडावरील ‘रोपवे’ला शासनाची मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मान्सून सुरु झाल्यामुळे अनेकांना सहलीचे वेध लागले आहेत. अशात गड-दुर्ग प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिवाजी महाराज आणि अफझलखानाच्या इतिहासाचं आणि महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असणाऱ्या किल्ले प्रतापगडावरील ‘रोप वे’ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे आता हा दुर्गम गड सर करणे सोपे होणार आहे.

याबाबतची अधिकृत घोषणा आज राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. रावल यांनी म्हटले कि प्रतापगडावर होणारा ५.६ किमी लांबीचा हा रोपवे प्रकल्प आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा रोप वे प्रकल्प असणार आहे. राज्यातील गडकोट किल्ले संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत आहेत. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असून छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. रोपवेमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे.

प्रतापगड सर करणे कठीण :

प्रतापगड हा स्वराज्याच्या आणि मावळ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा मोठा साक्षीदार असल्याने दुर्गप्रेमींची येथे नेहमीच गर्दी दिसून येते. घाटरस्त्याचा वापर करुन प्रतापगडावर जावे लागते. हा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे वाहतूककोंडीची समस्या नेहमीचीच आहे. पावसाळ्यात तर अनेक समस्यांना तोंड देत जावे लागते. शनिवार आणि रविवारी तर पर्यटकांची संख्या खूप जास्त असल्याने येथे पोहोचणे कठीण होऊन बसते. प्रतापगड अत्यंत दुर्गम असल्याने येथे ट्रेकिंग करण्यास देखील अनेक समस्या येतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे दिसते.

हा रोपवे प्रकल्प ५.६ किमी लांबीचा असून महाबळेश्वर तालुक्यातील जावळी गाव ते प्रतापगडावरील लँडविक पॉईंट असा असणार आहे. यामुळे प्रतापगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी हि सोयीची गोष्ट असणार आहे. यामुळे गड चढण्यासाठी लागणार वेळ कमी होणार असून मेहनतीचा त्रासही वाचणार आहे.

 

नियमित गुळाचे सेवन करा आणि ‘हे’ आजार टाळा

हेयर स्ट्रेटनिंग बिघडवते केसांचे आरोग्य

..अन्यथा कंडीशनर चा वापर ठरेल केसांसाठी हानिकारक

शरीरा तील विषारी घटक बाहेर टाकणे आवश्यक, करा हे उपाय