माढ्यातील लोकसभेची निवडणूक ‘यांच्या’साठी प्रतिष्ठेची, कोण मारणार बाजी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघात यंदाची निवडणुक ही प्रतिष्ठेची होणार असल्याचे मानले जात आहे. माढा लोकसभा मतदार संघाची स्थापना २००८ साली करण्यात आली. यापूर्वी २००९ साली झालेल्या निवडणुकीत माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ साली हा विजय कायम ठेवत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. अवघ्या २५००० मताधिक्याने त्यांचा विजय झाला होता. दरम्यान, माढ्याची निवडणुक ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

माढ्यात नाट्यमय घडामोडी
यंदाच्या निवडणुकणांमध्ये सुरुवातीपासूनच या मतदार संघात नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. सुरुवातीला या मतदार संघातून शरद पवार लढणार होते मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर या मतदार संघातून राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी लागणार यासाठी उत्सुकता लागली होती. माढ्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा चालू असताना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मात्र संजय शिंदे यांना देण्यात आली. या मधल्या काळात राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणारे घराणे दुखावले गेले. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपत प्रवेश केला. राष्टवादीला हा मोठा धक्का होता. त्यामुळे या नाराजीचे पडसाद यंदाच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत.

भाजपडून रणजितसिंह निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपकडून आधीपासूनच प्रतिष्ठच्या ठरलेल्या माढा लोकसभा मतदार संघात तगडा उमेदवार द्यायचा होता त्यामुळे भाजपडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा काँग्रेस आघाडीसाठी मोठा धक्का होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर माढ्याची उमेदवारी देखील देण्यात आली. सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ३६ चा आकडा आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यात राजकीय वैर आहे. त्यामुळेच रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे. रणजित निंबाळकर हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र असून, फलटण तालुक्यात दुग्ध व्यवसायातील बढे प्रस्थ आहे. याचा फायदा भाजपाला होणार आहे.

माढा मतदार संघ

एकूण मतदार – १७,१४,६३४

स्त्री मतदार – ८,०४,५४१

पुरुष मतदार – ९,१००९३

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like