‘मोठं मन’ दाखवत शिवसेनेची ‘मन की बात’, मुख्यमंत्री कोणाचाही झाला तरी तो आमचाच, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने युती केली, पण शिवसेनेने ठेवलेल्या अटींमध्ये एक अट अशीही होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा. मात्र लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजप अध्यक्षांनी पूर्णतः आपला मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करा, असं आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर महाराष्ट्रात नक्की कोणाचा मुख्यमंत्री असेल यावर वादावादी सुरु आहे. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो आमचाच असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी दोन्ही पक्षांमध्ये सगळं काही आलबेल असल्याचेही सांगितलं.

शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून शिवेसनेने मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि आमच्यात जसं ठरलं तसंच घडेल आणि मुख्यमंत्री कोणाचा या कोड्याचं आधीच सोडवलेलं उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल, असं सामना वृत्तपत्रात म्हणण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्री भाजपाचा असेल तरी आमचा आणि शिवसेनेचा असेल तरी आमचा,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे म्हणाले. राजकारणात ‘मैं’ला नव्हे, तर ‘हम’ला ताकद असते, असंही त्यांनी यावेळी सुचित केले.

आमच्यात कसलीही कुरघोडी वगैरे काही नाही. सगळं अगदी खुसखुशीत, चमचमीत आहे. समोर पंचपक्वानांचं ताट वाढलेलं असताना ते उधळण्याचा नतद्रष्टपणा आम्ही करणार नाही. या नात्यात ठिणगी पडू नये, वाद होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,’ असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. तसंच सत्ता आणणं हेच आमचे ध्येय आहे. सत्तेचं समसमान वाटप यात सगळं काही येतं. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात पूर्वी झालेली चर्चा लक्षात घेता सर्व त्याचप्रमाणे होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर