माझ्यावर Phd करायला चंद्रकांत पाटलांना 10 वर्षे लागतील, शरद पवारांचा ‘खोचक’ टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्याला शरद पवार यांनी त्यांच्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरील PHD चा मुद्दा उपस्थित केला होता. यावर पवारांनी खोचक उत्तर दिले. सर्वसाधारणपणे पीएचडी करायला 3 ते 4 वर्षे लागतात. मात्र, माझ्यावर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना 10 ते 12 वर्षे लागतील असा खोचक टोला त्यांनी लगावला.

मुंबईमध्ये आज राष्ट्रवादीकडून युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुण पीढीसोबत संवाद साधता आला याबाबत माला आनंद होत आहे. तुमची पिढी आणि माझी पिढी यामध्ये किती फरक आहे हे मला पहायचे आहे. आता माझे वय 80 झाल असले तरी मला प्रश्न विचारण्याची क्षमता कमी झाली नाही असे सांगताना त्यांनी तरुणांना त्यांच्या आमदारकीचा अनुभव सांगितला.

यावेळी तरुणांनी शरद पवार यांना अनेक प्रश्न विचारले. तरुणांनी विचारलेल्या प्रश्नांना शरद पवार यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्याचवेळी शरद पवार यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील अनेक अनुभव तरुणांसोबत शेअर केले. सार्वजनीक जीवनाची सुरुवात कॉलेज विश्वापासून सुरु झाली. त्यावेळी अभ्यास सोडून बाकी मी पारंगत होतो. मात्र, त्यावेळेस जोडलेली मैत्री मी आजही जपून आहे. आज देखील महाविद्यालयीन मित्र भेटत असतो असे शरद पवार यांनी सांगितले.

संवादादरम्यान शरद पवारांनी मांडलेले काही मुद्दे

शैक्षणिक अभ्यास बदलला पाहिजे, नव्या काळानुरुप बदल केला पाहिजे.

कॉलेज निवडणूक व्हायला हव्यात. यातून युवकांना संधी मिळते. राज्य सरकार याबाबत नक्की विचार करेल.

पवार कधी काय करतील हे सांगता येत नाही असं चित्र पत्रकार माझ्याविषयी निर्माण करतात मात्र नाऊमेद न होता काम करत रहावे. यासाठी धाडसाने काम करावे असेही त्यांनी सांगितले.

आयुष्यात चढउतार असतो. मोठ्या पदावर गेलो तरी आपले पाय जमीनीवर ठेवले पाहिजेत. पराभव झाला तरी पुन्हा उभारी घ्यायची असते.

सीईटी प्रवेश परीक्षा टाईमटेबल वेळेत यायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.