काय सांगता ! होय, संसदेत कामकाज चालु असताना ‘या’ खासदारानं चक्क गर्लफ्रेन्डला ‘प्रपोज’ केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या संसदेत कायमच गोंधळ सुरु असतो. तर कोणी झोपा काढत असतं, कोणी मोबाइलमध्ये खेळत असतात. अशा घटना आपल्या देशाच्या संसदेतच घडतच असतात. या पेक्षा भयानक प्रकार इतर देशांच्या संसदेत घडतात. आता हेच बघा ! इटलीच्या संसदेत एका खासदाराने सभागृहाच्या कामकाजादरम्यान सगळ्यांसमोर गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केलं. सभागृहात एका महत्वाच्या मुद्यावर चर्चा सुरु होती. ही चर्चा थांबवून खासदाराने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. या खासदाराची गर्लफ्रेंड तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसली होती.

परंतू सभागृहाचे अध्यक्ष रॉबर्टो फिको यांनी चर्चेदरम्यान खासदार फ्लेवियो यांच्या या कामामुळे त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. अध्यक्ष म्हणाले की मी तुमच्या या कारनाम्याने प्रभावित नक्कीच झालो, पण सभागृहाचे कामकाज थांबवून असे करणे योग्य नाही. ज्यावेळी या खासदार महोदयांनी गर्लफ्रेंडला प्रपोज केले तेव्हा सभागृहात भुकंपानंतर पुर्नव्यवस्थापनावर चर्चा सुरु होती.

एक वृत्तनुसार फ्लेवियो आणि एलिसा मागील 6 वर्षांपासून इटलीच्या वेंटीमिग्लियामध्ये एकत्र राहतात. एलिसा त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील सर्वात जवळची व्यक्ती आहे. ते लीग पार्टीचे सदस्य आहेत. गेल्यावर्षी मार्चमध्ये 33 वर्षीय खासदार फ्लेवियो डी मुरो यांनी विजय मिळवला.

Visit : policenama.com

Loading...
You might also like