इटलीमध्ये मोठी राजकीय उलथा-पालथ, पंतप्रधान ग्यूसेप कोंते यांनी दिला राजीनामा

रोम : वृत्तसंस्था – इटलीचे पंतप्रधान ग्यूसेप कोंते यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वृत्तसंस्था रायटर्सने राष्ट्रपतींच्या वक्तव्याने हा रिपोर्ट दिला आहे. राजीनाम्यानंतर नवीन सरकार बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तर यापूर्वी कोंते यांनी सीनेटमध्ये आपले सरकार पडण्यापासून वाचवल्यानंतर आपल्या आघाडीच्या बाहेरील खासदारांना विनंती केली की, त्यांनी त्यांच्या अल्पमतातील सरकारमध्ये सहभागी व्हावे. कोरोना महामारीमुळे झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी पंतप्रधानांना बहुमताची गरज आहे, या कारणामुळे त्यांनी खासदारांना त्याच्या पक्षात सहभागी होण्याची विनंती केली आहे.