‘कोरोना’तून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये का बोलवलं जातंय ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरुवातीच्या काळात कोरोना विषाणूचं केंद्र असणाऱ्या इटलीमध्ये आता कोरोना मधून बरे झालेल्या रूग्णांची तपासणी केली जात असल्याची नवीन माहिती समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनातून बरे झालेल्या लोकांना रुग्णालयात एकामागून एक बोलावले जात आहे. विशेषत: इटलीतील बर्गमो भागात कोरोनाचे रुग्ण अधिक होते. येथे कोरोनातून बरे झालेल्या सर्व रूग्णांना डॉक्टर विचारत आहेत की त्यांना बरं वाटत आहे का? यापैकी निम्मे रुग्ण पूर्णपणे बरे झाले नसल्याचं सांगत आहेत.

वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, कोरोना निगेटिव्ह झालेल्या लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत, हृदय व फुफ्फुसांची तपासणी केली जात आहे आणि लोकांना जीवनात होणाऱ्या बदलांविषयीही विचारणा केली जात आहे, जेणेकरुन हे समजू शकेल हे कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतरही शरीरावर विषाणूचा कसा प्रभाव आहे.

डॉक्टरांनी कोरोना निगेटिव्ह असलेल्या 54 वर्षाच्या महिलेला विचारले, तुला कसे वाटले, मग तिने सांगितलं की तिला 80 वर्षांची झाल्यासारखं वाटतंय. इटलीमधील बर्गामो मधील आरोग्य तज्ज्ञ आता असा इशारा देत आहेत की कोरोनातून लोक अर्धवट बरे होत आहेत, काही वेळा त्यासाठी बराच वेळ लागू शकेल.

संसर्गजन्य रोग तज्ञ सेरेना वेंच्युरेली म्हणाल्या की हा विषाणू लोकांच्या शरीरातून गेला आहे, परंतु त्याचा परिणाम शरीरावर अजूनही कायम आहे. आम्ही लोकांना विचारत आहोत की तुम्हाला बरे वाटत आहे का, जवळजवळ अर्धे लोक म्हणतात- ‘नाही’. सुरुवातीच्या 750 रूग्णांपैकी सुमारे 30 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांवर चट्टे असल्याचे दिसून आले आणि त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.

आता इटली संशोधनासाठी कोरोना रूग्ण असलेल्या लोकांच्या पाठपुराव्यातून गोळा केलेल्या माहितीचा वापर करत आहे. बर्गमोचे डॉक्टर म्हणतात की हा रोग स्पष्टपणे संपूर्ण शरीरावर प्रभाव टाकतो. परंतु त्याचा परिणाम वेगवेगळ्या रुग्णांवर वेगवेगळा दिसून येत आहे.