Coronavirus : हळू-हळू कमकुवत होतोय ‘व्हायरस’, ‘कोरोना’वर इटलीतील ज्येष्ठ डॉक्टरांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना साथीचा लढा देणार्‍या देशांसाठी एक चांगली बातमी आहे. इटलीच्या शीर्ष डॉक्टरांनी असा दावा केला आहे की कोरोना विषाणूची क्षमता कमी कमी होत आहे आणि दोन महिन्यांपूर्वी तो जितका प्राणघातक होता आता तेवढा राहिलेला नाही. लोम्बार्डीतील सॅन रॅफेल हॉस्पिटलचे प्रमुख अल्बर्टो जंग्रिलो म्हणाले की कोरोनाची घटणारी क्षमता ही लोकांसाठी एक दिलासा देणारी बाब आहे. वैद्यकीयदृष्ट्या, आता कोरोना विषाणू इटलीमध्ये अस्तित्वात नाही. गेल्या दहा दिवसांच्या तपासणीत जे तथ्य समोर आले आहेत त्यानुसार दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत व्हायरस आता कमकुवत होत असल्याचे दिसत आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी इटली हा एक देश आहे आणि कोविड -19 मुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंमध्ये इटली तिसर्‍या क्रमांकावर आहे. तथापि, मे महिन्यात येथे संक्रमण आणि मृत्यूच्या नवीन घटनांमध्ये मोठी घट झाली असून बर्‍याच ठिकाणी लॉकडाऊन उघडण्यात येत आहे. डॉक्टर जंग्रिलो म्हणाले की, काही तज्ञ संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या संभाव्यतेबद्दल खूप चिंताग्रस्त होते, याकडे देशातील नेत्यांनी व्ययस्थित लक्ष दिले पाहिजे. तसेच ते म्हणाले की आपल्याला एक सामान्य अवस्थेत देश परत मिळाला आहे पण हे संकट पुन्हा उद्भवू नये याची जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागेल.

इटालियन सरकारने लोकांना असे सांगितले आहे की कोरोना विषाणूवर आत्ताच विजयाचा दावा करणे हे घाईचे ठरू शकते. आरोग्य मंत्रालयाच्या मंत्री सँड्रा जांपा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘कोरोना विषाणूच्या समाप्तीसाठी प्रलंबित असलेल्या वैज्ञानिक पुराव्यांचा अवलंब केला जात आहे. मी त्यांना सांगू इच्छिते की इटलीच्या लोकांना गोंधळात टाकू नये.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like