Coronavirus : इटलीवर पुन्हा ‘कोरोना’चा सावट, अधिकच जीवघेणा होऊ शकतो ‘व्हायरस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे 29,315 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु आता देशात कित्येक आठवड्यांनंतर लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात येत आहे. दरम्यान, संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये पुन्हा विनाश होण्याची शक्यता आहे, जी पूर्वीपेक्षा जास्त प्राणघातक असेल. इम्पीरियल कॉलेज लंडनच्या एका मूल्यांकनानुसार, लॉकडाऊनमधून सूट दिल्यानंतर इटलीमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणू थैमान घालू शकतो. जर इटलीमधील 20 टक्के लोकांनी आपले सामान्य काम सुरू केले तर 5000 लोकांचा मृत्यू होऊ होऊ शकतो.

तसेच लोकांच्या घरातून बाहेर पडण्यामध्ये 40 टक्के वाढ झाली तर अवघ्या दोन महिन्यांत 23 हजार अधिक लोक मारले जाऊ शकतात. त्याच बरोबर, इटलीमधील लोक गेल्या 2 महिन्यांपासून त्यांच्या घरात बंद होते, परंतु आता लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात येत आहे.

इटलीमध्ये संक्रमित लोकांची संख्या 2 लाख 13 हजारांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, इटलीची लोकसंख्या जवळपास 6 कोटी आहे. परंतु या छोट्या देशात व्हायरसमुळे जनजीवनावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, संशोधकांनी कबूल केले आहे की, त्यांचे मूल्यांकन निराशावादी आहे आणि प्रतिबंधात्मक घटक विचारात घेतलेले नाही. परंतु संशोधकांनी असे म्हटले आहे की त्यांचे मूल्यांकन लोकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सामाजिक अंतर, आणि मास्क घालणे आवश्यक आहे.