ITAT | करदात्यांसाठी वरदान ठरू शकतो ‘इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्यूनल’चा निर्णय, मिळेल मोठा दिलासा; जाणून घ्या
नवी दिल्ली : ITAT | जर तुमच्याकडे तोट्यात चाललेली संपत्ती असेल तर तुम्ही प्राप्तीकर अपीलीय न्यायाधिकरण म्हणजे इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्यूनल, मुंबईच्या (ITAT) अलिकडील निर्णयाचा लाभ घेऊ शकता. यास एक प्रॉफिटेबल अकाऊंट (असेट ट्रान्सफर) ने लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) च्या विरूद्ध सेट-ऑफ केले जाऊ शकते, अशाप्रकारे एकुण कर दायित्व प्रभावीपणे कमी केले जाऊ शकते.
आयटीएटीने ठेवले लक्ष
ITAT-मुंबईने, मायकल ई देसा विरूद्ध प्राप्तीकर अधिकारी आंतरराष्ट्रीय कर आकारणी प्रकरणात पुर्नच्चार केला की, कर-नियोजन एक कायदेशीर क्रिया आहे आणि जर कायद्याच्या संररचनेंतर्गत केले गेले तर यास करापासून वाचण्याच्या रूपात मानले जाऊ शकत नाही.
हे ठरवण्यासाठी प्राप्तीकर नियमानुसार, लाँगटर्म कॅपिटल लॉस हा लाँग टर्म कॅपिटल गेनशिवाय एखाद्या दुसर्या उत्पन्नाविरूद्ध सेट ऑफ करता येऊ शकत नाही. मात्र, शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस हा, लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेनविरूद्ध सेट ऑफ करता येऊ शकतो.
काय होईल निर्णयाचा परिणाम
अनेकदा अधिकारी अशा सेट-ऑफवर प्रश्न उपस्थित करतात आणि दावा करतात की करदाता करापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे.
नवीन निर्णयाने करदात्याला आतापासून सेट-ऑफचा दावा करण्यात मदत होईल.
Pune Crime | पुणे शहरातील 2 अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 41 जणांवर कारवाई
या विशेष प्रकरणात, आयटीएटीने अपीलकर्त्याला संपत्तीच्या विक्रीवर लाँग टर्म कॅपिटल गेनसह एक नॉन लिस्टेड कंपनीच्या शेयरच्या विक्रीवरील नुकसान समायोजित करण्याची परवानगी दिली.
थोडक्यात प्रकरणाची माहिती
अमेरिकन नागरिक, करदात्याने संपत्तीच्या विक्रीवर एलटीसीजी केले.
त्यांनी एक नॉन लिस्टेड कंपनीत शेयरच्या विक्रीवर लाँग टर्म कॅपिटल लॉसची माहिती प्राप्तीकर विभागाला दिली आणि म्हटले की, यास माझ्या एलटीसीजीसोबत सेट ऑफ करण्यात यावे.
एसेसी अधिकार्यांनी सेट ऑफला हे म्हणत नकार दिला की, शेयरची विक्री प्राईम ऑफ फेसीमध्ये काल्पनिक दिसत आहे.
ज्याच्या विरूद्ध करदात्याने आयटीएटीमध्ये अपील केले.
पूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर आयटीएटीने मान्य केले की, एसेसीचा कोणताही अधिकारी व्यवहाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण यातून एसेसीला टॅक्स बेनिफिट मिळते.
निर्णयाबाबत काय म्हणतात तज्ज्ञ
हे पाहता प्राप्तीकर कायद्यात अशा तरतूदी आहेत ज्या उत्पन्नात होणार्या नुकसानीच्या एका सेट-ऑफची परवानगी देतात.
यावर तज्ज्ञ म्हणतात की, हा निर्णय खुप चांगल्याप्रकारे एक उदाहरण म्हणून समोर येऊ शकतो.
आर्थिक मालमत्तांच्या विक्रीवर भांडवली नफ्याचे नियोजन करण्याच्या पद्धती – इक्विटी, बाँड आणि स्थिर मालमत्ता- ज्या एक मालमत्ता वर्गाकडून दुसर्या उत्पन्नासह नुकसानीची भरपाई करत आहेत.
High Court | वस्त्रांवरूनही ‘स्पर्श’ केल्यास लैंगिक अत्याचार; विधिज्ञांचा न्यायालयात युक्तिवाद