जवानांना ‘जीवनसाथी’ निवडण्याकरिता मदत करणार ITBP, सुरू करणार ‘विवाह’ पोर्टल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारत तिबेट सीमा पोलीस अर्थातच आय. टी .बी. पी. ने आपल्या सैन्य दलातील अविवाहित तसेच विधवा कर्मचाऱ्यांना सैन्यदलातच जीवनसाथी मिळावा यासाठी एक वैवाहिक पोर्टल तयार केले आहे . त्याचे नाव ‘मॅट्रिमोनिअल पोर्टल’. कोणत्याही अर्धसैनिक दलात अशाप्रकारचं पाऊल पहिल्यांदाच उचलण्यात आलय.

अधिकाऱ्यांनी सांगितले कि, ‘ डोंगराळ भागातील लढाईत पारंगत असणाऱ्या या दलावर प्रामुख्याने चिनच्या बाजूकडील सीमारेषेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. या दलात तब्बल २५०० अविवाहित पुरुष आणि १००० अविवाहित महिला आहेत’. आय. टी . बी . पी च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, ‘बरेच जवान हे घरापासून दूर राहतायत आणि मग अशा परिस्थितीत चांगलं विवाहस्थळ शोधन जवानांच्या घरातल्यांसाठी अवघड होते’.

माहितीनुसार, या दलात तब्बल ३३३ कार्यरत दाम्पत्य आहेत. बरेच कर्मचारी याच दलातील जोडीदार शोधात आहेत. याच मूळ कारण असं कि, अशा दाम्पत्याना एकाच ठिकाणी काम करण्याची संधी मिळते.तसा नियमच आहे. ‘सैन्य दलातील कर्मचाऱ्यांसाठी हि सुविधा खूपच आनंददायी ठरेल’ , असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/