१२ वी पास असणार्‍यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; ‘ITBP’मध्ये कॉन्स्टेबलच्या १२१ जागांसाठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स ( ITBP ) मध्ये १२ वी पास विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ITBP मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) या पदासाठी १२१ जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष व कमाल वय २३ वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. उमेदवाराची निवड शारीरिक मानक चाचणी (PST) बरोबरच मेडिकल टेस्टच्या आधारे करण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता – १२ वी पास

वयोमर्यादा – किमान वय १८ वर्ष व कमाल वय २३ वर्ष

अर्ज शुल्क
सामान्य / इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. १०० / –
अनुसूचित जाती / जमाती / महिलांना अर्ज शुल्क नाही

अर्ज करण्याची मुदत
अर्ज करण्याची तारीख – २२ एप्रिल २०१९
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २१ जून २०१९

नोकरीचे ठिकाण – भारतातील कोणत्याही राज्यात

निवड प्रक्रिया – शारीरिक मानक चाचणी (पीएसटी) आणि मेडिकल टेस्टच्या आधारे

वेबसाईट – www.recruitment.itbpolice.nic.in

महत्त्वाच्या बातम्या

पुणे वाहतूक शाखेतील ‘ढेरपोटे’ पोलिसांना ड्यूटी नाही ; उपायुक्तांचा आदेश

पुण्यात मध्यरात्री भारताचा विजय साजरा करणाऱ्या ‘क्रिकेटप्रेमीं’वर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’

क्रूर घटना : चिमुरड्याला ‘विवस्त्र’ करुन बसविले तापलेल्या फरशीवर ; पार्श्वभाग भाजला