Itching And Rashes Problem In Summer | उन्हाळ्यात त्वचेला खाज-जळण्याची समस्या वाढते, ‘हे’ उपाय अत्यंत प्रभावी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Itching And Rashes Problem In Summer | या उन्हाळ्यात देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम आहे. तर तीव्र ऊन आणि उष्णतेमुळे आरोग्याच्या विविध समस्या वाढतात. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हीही अनेकदा बाहेर असाल तर तुमच्या शरीराची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या (Summer Care). आरोग्य तज्ञांच्या मते, या उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेशी संबंधित अनेक आजार निर्माण होतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले द्या. बाहेर पडताना नेहमी हातपाय पूर्ण झाकले जातील, असे कपडे घाला आणि डोके झाकून ठेवा (Itching And Rashes Problem In Summer).

 

उन्हाळ्यात तीव्र ऊन आणि घामामुळे त्वचेत लालसरपणा, चिडचिड, पुरळ आणि खाज सुटणे या समस्या उद्भवतात. इतकेच नव्हे तर, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कात येतात त्यांना त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील असू शकतो, त्यांनी आपल्या त्वचेची काळजी घ्यावी (Itching And Rashes Problem In Summer).

 

चला जाणून घेऊयात या ऋतूमध्ये त्वचेशी संबंधित कोणत्या प्रकारच्या समस्यांना अनेकदा जास्त धोका असतो, तसेच त्या टाळण्यासाठी काय करता येईल ?

 

सनबर्नची समस्या (Sunburn Problem) :
उन्हाळ्यात सनबर्नमुळे त्वचेत वेदना, लालसरपणा आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याचा आणि सनस्क्रीन लावा. आपली त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेर जाताना सनस्क्रीन क्रीम लावा आणि थेट सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा.

मुरुमांची समस्या (Acne Problem) :
उष्णतेत तापमान जास्त असल्यामुळे घाम जास्त येतो. आपल्या त्वचेवर बॅक्टेरिया किंवा तेलाचा संपर्क येतो तेव्हा आपली त्वचेवरील रंध्र (छिद्र) बंद होऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसात मुरुम येतात. हे टाळण्यासाठी चेहरा थोडा वेळ स्वच्छ थंड पाण्याने धुऊन स्वच्छ टॉवेल किंवा कपड्यांनी घाम पुसावा. घामाने भिजलेले कपडे, हेडबँड, टॉवेल्स आणि टोप्या पुन्हा घालण्यापूर्वी धुवा. चेहरा, मान, पाठ आणि छातीवर नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादने वापरा.

 

त्वचेत खाज सुटण्याची समस्या (Itchy Skin Problem) :
उष्णतेत पुरळाची समस्या देखील बर्‍याचदा त्रास देते. जेव्हा घामाच्या ग्रंथी बंद होतात, तेव्हा घाम शरीरातून बाहेर पडू शकत नाही. अशा पसिस्थितीत लहान पुरळ (घामोळ्या) होऊ शकतात. उष्णतेचे पुरळ टाळण्यासाठी थंड, सैल कपडे घाला आणि घाम येत असल्यास, आपल्या त्वचेच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करावी.

 

एक्झामा ही एक तीव्र समस्या (Eczema Is A Serious Problem) :
ज्यामुळे त्वचेत खाज सुटणे, लालसरपणा किंवा चट्टे पडतात. तापमान वाढल्यामुळे त्वचेत जळजळ होऊ शकते.
एक्झामाचा धोका कमी करण्यासाठी, शरीराचे सामान्य तापमान राखण्याचा प्रयत्न करा. घाम स्वच्छ पाण्याने नियमित धुवावा. स्वच्छ कपडे घाला.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Itching And Rashes Problem In Summer | remedies for skin itching and rashes problem during summer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ketki Chitale Police Custody | शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तब्बल ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी

 

Andrew Symonds Dies In Car Crash | 46 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यु

 

FIR On Ketaki Chitale In Pune | शरद पवारांवरील पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात पुण्यात दाखल