Itchy & Dry Skin | त्वचा नेहमी कोरडी राहते का? ‘हा’ आजार असू शकतो कारणीभूत

Itchy & Dry Skin | itchy and dry skin surprising causes you must know
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Itchy & Dry Skin | हिवाळ्यात वारंवार बदलणार्‍या हवामानामुळे लोकांना कोरड्या आणि खाज सुटणार्‍या त्वचेचा सामना करावा लागतो. पण जर तुम्हाला प्रत्येक ऋतूमध्ये या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. त्वचेवर खाज सुटणे किंवा कोरड्या त्वचेच्या समस्येकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे त्वचेला तडे जाऊ शकतात आणि त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. (Itchy & Dry Skin)

 

ड्राय स्कीनची प्रमुख कारणे

1. स्कीन इन्फेक्शन (Skin Infection) –
तज्ज्ञांनुसार, जेव्हा त्वचा कोरडी असते तेव्हा खूप खाज सुटते. ही समस्या वेळीच दूर न केल्यामुळे त्वचा हळूहळू खूप खडबडीत आणि वृद्ध दिसू लागते. यासोबतच बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि त्वचेचा रंग बदलण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते.

 

2. क्रॉनिक डिसीज (Chronic Diseases) –
तज्ज्ञांनुसार, थायरॉईड, डायबिटीज, किडनी किंवा लिव्हरशी संबंधित समस्यांमुळेही स्कीन ड्राय होऊ लागते. जास्त धुम्रपान केल्याने त्वचेला खाज सुटणे आणि कोरडेपणा येऊ शकतो, असेही तज्ज्ञ म्हणतात. (Itchy & Dry Skin)

 

3. मेन्टल हेल्थसंबंधी समस्या (Mental Health Problems) –
एंग्जायटी, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) आणि नैराश्यामुळे त्वचेत कोरडेपणा आणि खाज येऊ शकते. कधीकधी नर्व्ह डिसऑर्डर जसे की, मल्टिपल स्क्लेरोसिस, पिंच नर्व्हस आणि हर्पीस झोस्टर यामुळे त्वचा कोरडी होते.

 

4. वृद्धत्व आणि जीन्स –
त्वचा कोरडी होणे आणि खाज येण्यामागे वृद्धत्व हे देखील एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वयाच्या 25 वर्षांनंतरच या समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्वचेत कोरडेपणा आणि खाज येण्याची समस्या हवामान किंवा ठिकाण बदलल्यामुळे देखील होऊ शकते.

खाज आणि कोरड्या त्वचेच्या समस्येवर टिप्स
कोरड्या त्वचेची समस्या टाळण्यासाठी, आंघोळीची वेळ कमी करणे महत्वाचे आहे. जास्त वेळ आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते तसेच त्वचेतील नैसर्गिक तेलही संपुष्टात येऊ लागते.

कोरड्या त्वचेच्या समस्येला तोंड देण्यासाठी पेट्रोलियम जेली खूप मदत करू शकते. पेट्रोलियम जेली नेहमी सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा त्वचा कोरडी वाटेल तेव्हा लगेच पेट्रोलियम जेली वापरा.

आंघोळीनंतर शरीर चांगले धुवा आणि मॉइश्चरायझर वापरा. यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहील.

आंघोळ करताना साबण वापरू नका. साबण त्वचेची पीएच लेव्हल खराब करतो ज्यामुळे त्वचा खूप कोरडी होते.

त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेला आतून हायड्रेट करण्यासाठी आहारात फळे, धान्य, बिया आणि काजू यांचा समावेश करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Itchy & Dry Skin | itchy and dry skin surprising causes you must know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले चोरटे मंगळवार पेठेतून अटकेत

 

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटची तब्बल 1 कोटींची फसवणूक

 

Beauty Tips | तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने Face Serum चा वापर करता का? मग व्हा सावध!

Total
0
Shares
Related Posts