सावधान ! PAN नंबर सोशल मिडीयावर शेअर करू नका, आयकर विभागानं दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने सर्व PAN धारकांना चेतावणी दिली आहे की आपला 10 अंकी PAN नंबर सोशल मिडियावर शेअर करु नका. विभागाकडून सांगण्यात आले की याचा चूकीचा वापर केला जाऊ शकतो. असे अनेक करदाता आहेत जे ट्विटरवर आयटीआर आणि इनकम टॅक्स रिटर्नविषयी चर्चा करतात. यातील अनेक जण असे आहेत जे ट्विटवर आपला PAN नंबर टाकतात. परंतू हे घातक ठरु शकते अशी सूचना देत आयकर विभागाने करदात्यांना चेतावणी दिली आहे.

PAN सारख्या खासगी माहितीवरुन फसवणूक करणारे लोक माहिती चोरु शकतात. UIDAI ने देखील आधार कार्ड नंबर सोशल मिडियावर शेअर करु नका अशी सूचना दिली होती. कारण हे सर्व नंबर बँक खात्याला आणि एकमेकांना लिंक आहेत. त्यामुळे हे नंबर सोशल मिडियावर शेअर करणं धोक्याचं ठरु शकतं.

करदाता कर भरण्यासंबंधित व इतर माहिती एका ऑनलाइन फॉर्म बरोबर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारु शकतो. जेथे थेट कर अधिकारी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देतील. या फॉर्ममध्ये तुमचे नाव, PAN असेसमेंट इयर, मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि सोशल मिडियाचा यूजर आयडी द्यावा लागेल. तसेच आयकर विभागाने ऑनलाइन क्वेरी फॉर्मची लिंक देखील दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like