काय सांगता ! होय, हुबेहुब ‘आयफोन 11’ सारखा स्मार्टफोन फक्त 10 हजार रूपयात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयटेल (itel) लवकरच आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. विशेष म्हणजे या आयटेलच्या फोनची डिझाइन आयफोन ११ सारखी आहे आणि आयटेलचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच मिळणार आहे. तथापि, कंपनीकडून अजून तरी या स्मार्टफोनचे नाव आणि मॉडेल नंबर काय असणार याबाबत खुलासा केला नाही.

लिक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेऱ्याचा सेटअप देखील मिळणार आहे आणि या कॅमेऱ्याची डिजाईन ही आयफोन ११ सिरीज सारखीच आहे. तसेच यात एक फ्लॅशलाईट देखील असणार आहे. या लिक झालेल्या फोटोवर DikhaoApnaJaadu या हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे.

आयटेलच्या या स्मार्टफोनची लॉंचिंग याच महिन्यात होणार असून हा स्मार्टफोन जरी आयफोन ११ सारखा दिसत असेल तरीही या स्मार्टफोनची किंमत खूप कमी असून फक्त १० हजार इतकी आहे. बाजारात या स्मार्टफोनचा सामना रिअलमी सी ३ आणि रेडमी ८ या फोनसोबत होणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर बॅटरी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) चा सपोर्ट मिळणार आहे. तसेच ऑक्टाकोर प्रोसेसर देखील असणार आहे. आयटेल २०१९ च्या चौथ्या तिमाहीत ५ हजार किमतीच्या फोनमध्ये दुसऱ्या स्थानावर असून फिचर फोनच्या मार्केटमध्ये देखील आयटेलचे २२ टक्के शेअर आहेत.