itel नं लॉन्च केला जबरदस्त स्मार्टफोन, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय बजेट स्मार्टफोन ब्रँड इंटेलने आपले नवीन स्मार्टफोन itel Vision 1 Pro भारतात लाँच केले आहे. itel Vision 1 Pro स्मार्टफोनची किंमत 6,599 रुपये आहे. फोन सिंगल स्टोरेज व्हेरियंट 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येईल. याव्यतिरिक्त, फोन ऑरा ब्लू आणि ओशन ब्लू कलर या दोन कलर ऑप्शन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. सिक्युरिटी फीचर म्हणून फोनला फेस अनलॉक आणि मल्टी फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट आहे. फोनवर चार्जर, केबल, यूजर मॅन्युअल, बॅक कव्हर, वॉरंटी कार्ड आणि ब्लूटूथ हेडसेट बॉक्ससह असतील, दरम्यान ही लिमिटेड पीरियड ऑफर असेल.

इंटेल व्हिजन 1 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन वॉटरड्रॉप Incell डिस्प्लेसोबत येईल. फोनचे रिझोल्यूशन 1600/720 पिक्सेल असेल. फोनमध्ये 450 nits ब्राइटनेस आहे. फोनची स्क्रीन टू बॉडी रेशो 89.5% असेल. फोटोग्राफीसाठी फोनला 8MP लेन्ससह 2 VGA कॅमेरा आणि फ्लॅश लाईटचा सपोर्ट मिळेल. सेल्फीसाठी फोनला 5MP लेन्सचा सपोर्ट असेल. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये 1.4 GHz Quad Core प्रोसेसर वापरला गेला आहे, जो अँड्रॉइड 10 ( Go एडिशन) आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. फोनला पॉवरबॅकसाठी 4000mAh नॉन-रिमूव्हल बॅटरी मिळेल. व्होल्ट / व्हीएलटीई / व्होईफाई समान कनेक्टिव्हिटी म्हणून सपोर्ट असेल.