आयटीआयच्या ५० हजार जागा वाढवणार ; आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मिळणार ‘फी’मध्ये सवलत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये (आयटीआय) सुमारे ५० हजार प्रवेश क्षमता वाढविणार आहे. याबाबतची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पत्न अडीच लाखाच्या आत असल्यास प्रवेश फी पूर्णपणे परत दिली जाईल. तर अडीच ते आठ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांची ८० % प्रवेश फी परत दिली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

आयटीआयमध्ये प्रवेश क्षमता वाढविण्याबाबतची लक्षवेधी राष्ट्रवादीचे सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी मांडली होती. त्यावर उत्तर देताना रणजीत पाटील म्हणाले, राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मागणीच्या व्यवसायाच्या ७४७ तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवेश क्षमता ५११८४ ने वाढणार आहे. ज्या कोर्सला कमी मागणी आहे ते बंद करून, ज्यांना मागणी जास्त आहेत, त्याची प्रवेश क्षमता वाढवण्यात येणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून इयत्ता दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन वर्ष कालावधीचे अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अशा ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्रात ४१७ सरकारी आणि ४२५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रत्येक वर्षी सरासरी १ लाख ४० हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध होतात.

आरोग्यविषयक वृत्त –

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण 

 

You might also like