मैं कायर नहीं हूं…सॉरी पापा, सुसाइड नोट लिहून ITI च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठी वचून व्हाल भावूक

नवी दिल्ली वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये झालेल्या छळामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. विद्यार्थ्याची मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. घाईघाईत सीओ आणि कोतवाल मोठ्या फोर्ससह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तहरीरच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालगंज कोतवालीच्या बेल्हा गावात जोखू लाल वर्मा यांचा 20 वर्षीय मुलगा धीरेंद्र प्रतापगडमध्ये आयटीआयचा विद्यार्थी होता. शनिवारी तो सूट्टी निमित्ताने गावी आला आणि संध्याकाळी दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत गळफास लावला. दुपारी त्याची आई शेतातून परत आली आणि धीरूला खायला देण्यासाठी गच्चीवर गेली. आईने आवाज देऊनही खोलीच्या आतून आवाज आला नाही.नंतर आईने दरवाजा ठोठावला त्यानंतरही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याची आई घाबरली.

जेव्हा मृतकच्या आईने खोलीतील स्कायलाईटमधून डोकावले तेव्हा आतलं दृश्य पाहून ती किंचाळली. तिची ओरड ऐकून हे कुटुंबातीस सदस्यही गच्चीवर पोहोचले. कुटुंबातील सदस्यांच्या आरडाओरडावरून गावातील लोकही मोठ्या संख्येने जोखू शर्माच्या घरात जमले.

पोलिसांना मृत विद्यार्थ्याकडून सुसाइड नोटही मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये मृतक विद्यार्थ्याने सातत्याने अत्याचार केल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असलेल्या गावातीलच हिरासिंग व त्याचा मेहुणा भिष्मसिंह यांना जबाबदार धरले आहे.

सुसाईड नोटमध्ये मृत विद्यार्थ्याने वडिलांना भावनिक पत्रात म्हटले आहे की, तो भ्याड नाही तर आरोपीच्या छळामुळे आत्महत्या करतो आहे …. सॉरी बाबा. दुसरीकडे वडील जोखू लाल शर्मा आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करीत आहेत. त्याच वेळी या प्रकरणाची माहिती मिळताच सीओ जगमोहन व कोतवाल संजय यादव आणि दरोगा सुनील राय मृताच्या घरी पोहोचले. सुसाइड नोट ताब्यात घेतल्यानंतर सीओ व कोतवाल यांनी नातेवाईक व ग्रामस्थांची तासनतास विचारपूस केली. तहरीरच्या आधारे चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सीओ जगमोहन यांनी सांगितले. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.