ITR Alert ! तुम्हाला सुद्धा प्राप्तीकर विभागाकडून SMS येतात का, काय आहे याचा अर्थ आणि तुमच्यासाठी किती महत्वाचे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ITR Alert | प्राप्तीकर विभागाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तीकर रिटर्न फॉर्म (Income Tax Return Form) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित केली आहे आणि वारंवार SMS पाठवून करदात्यांना जागरुक करत आहे. यावेळी विभागाकडून (Income Tax Department) अनेक प्रकारचे एसएमएस येत असल्याने करदात्यांमध्येही संभ्रम निर्माण होत आहे. (ITR Alert)

 

तुम्हाला प्राप्तीकर विभागाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे एसएमएसही येत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करण्याची गरज नाही. हे मेसेज तुम्हाला समजल्यानंतर तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतील. याच्या मदतीने तुम्ही तुमचा आयटीआर अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीने भरू शकाल. (ITR Alert)

 

डेटा व्हेरिफिकेशनचा अर्थ
प्राप्तीकर विभाग यावेळी करदात्यांना नवा मेसेज पाठवत आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यास आणि आयटीआर भरण्यापूर्वी सर्व डेटा व्हेरिफाय करण्यास सांगितले जात आहे. प्राप्तीकर विभागाकडून येणार्‍या अशा एसएमएसमध्ये असे म्हटले आहे की, आयटीआर भरण्यापूर्वी तुमचा डेटा फॉर्म 26एएस आणि अ‍ॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (एआयएस) सारख्या कागदपत्रे जमवणे आणि आकडे पडताळणी करण्यास सांगितले जात आहे.

 

प्रप्तीकर यावेळी सर्व वार्षिक व्यवहारांशी संबंधित सर्व आकडे एआयएसमध्ये समाविष्ट करून देत आहे,
ज्यामुळे रिटर्न भरणे सोपे होईल आणि पारदर्शकताही वाढेल.
याशिवाय, फॉर्म 26एएसमध्ये तुमच्याही गुंतवणूकीची माहिती असेल, जी आयटीआर फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीशी जुळवून व्हेरिफाय करावी लागेल.
तुम्ही हे दोन्ही फॉर्म प्राप्तीकर विभागाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता.

लवकर आयटीआर भरण्याचा मेसेज
दुसर्‍या प्रकारच्या एसएमएसमध्ये, प्राप्तीकर विभाग करदात्यांना त्यांचे प्राप्तीकर रिटर्न लवकरात लवकर भरण्यास सांगण्यात येत आहे.
या एसएमएसमध्ये रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेचा हवाला देऊन करदात्यांना शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
विभागाने यावर्षी प्राप्तीकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित केली आहे. अशावेळी उशीर न करता रिटर्न लवकर भरणे चांगले.

 

Web Title :- ITR Alert | do you know about the sms alert comes from income tax department see full detail here

  
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, मात्र ‘या’ चार ठिकाणी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार

 

Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार

 

Income Tax Return | कोणत्या लोकांना असते ITR Form-1 ची आवश्यकता, कशी आहे तो ऑनलाइन भरण्याची पद्धत; येथे जाणून घ्या पूर्ण डिटेल्स