‘ITR’ भरणं राहून गेलं असेल तर अजूनही ‘हा’ पर्याय शिल्लक, जाणून घ्या ‘प्रक्रिया’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आता निघून गेली आहे आणि तुम्ही अजूनही तुमचा आयकर रिटर्न भरलेला नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण तुम्ही अजूनही रिटर्न फाइल करु शकतात. रिटर्न फायलिंगमध्ये यंदा 41% वाढ झाली आहे.
दंड देऊन दाखल करु शकतात ITR –
शेवटची तारीख झाल्यानंतर आता तुम्ही दंड भरुन ITR फाइल करु शकतात. सीबीडीटी नुसार, व्यक्तिगत आयकरदाता, नोकरदार, हिंदू अविभाजित कुटूंब आणि ज्या लोकांना ऑडिटिंगची गरज नाही त्यांना 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न दाखल करणे अनिवार्य आहे.
किती दंड भरावा लागेल –
31 ऑगस्टपासून 31 डिसेंबर 2019 – 5,000 रुपये दंड
1 जानेवारी 2020 ते 30 मार्च 2020 – 10,000 रुपये दंड
ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना लेट फी म्हणून 1,000 रुपये द्यावे लागतील.
यांच्यासाठी 30 सप्टेंबर शेवटची तारीख –
ज्या कंपन्यांना अकाऊंट ऑडिटिंग आवश्यक आहे त्यांना ITR भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. तर ज्यांना 92 ई अंतर्गत रिपोर्ट द्यायचा आहे त्यांना 30 नोव्हेंबर शेवटची तारीख असेल.
7 मिनिटात भरा ITR –
करदाता आता ई फायलिंगच्या माध्यमातून रिटर्न फाइल करु शकतात. ही सेवा https://www.incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. याला e-filing lite सुविधा नाव देण्यात आले आहे.
ही आहे व्हेरिफाय करण्याची लिंक –
आयकर विभागने आयटीआर व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्या ई-फायलिंग पोर्टलवर एक नवीन https://www.incometaxindiaefiling.gov.in/home लिंक सुरु केली आहे. ही लिंक ई व्हेरिफाय रिटर्न नावाने क्विक सेक्शन मध्ये देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ई व्हेरिफिकेशन पेज ओपन होईल. येथे पॅन कार्ड, असेसमेंट ईयर आणि आयटीआर फॉर्म – ५ वर देण्यात आलेल्या पावती नंबरवरील माहिती देऊन आयटीआर व्हेरिफाय करु शकतात.
१२० दिवसात व्हेरिफाय करावे लागेल आयटीआर –
आयकर विभागानुसार, आयटीआर दाखल केल्यानंतर १२० दिवसात व्हेरिफाय करावे लागेल. आयटीआर दाखल केल्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असल्याने त्यानंतर देखील तुम्ही याला व्हेरिफाय करु शकतात. जर तुम्ही आयटीआर व्हेरिफाय केले नाही तर ही प्रकिया पूर्ण होणार नाही आणि तुमचा आयटीआर फाइल केली जाणार नाही तसेच तुम्हाला दंड देखील भरावा लागेल. आयटीआर व्हेरिफिकेशन ही आयटीआर फायलिंगचा टप्पा आहे. जर तुम्ही आयटीआर फाइल केला आणि व्हेरिफिकेशन झाले नसेल तर तुमच्या आयटीआर फायलिंगचा विचार केला जाणार नाही.
- तरूणांनो, हँडसम दिसायचेय ? …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ
- झोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम
- गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
- वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण
- रोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण
- दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी
- ‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी
- सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या